महसूल गुप्तचर संचालनालयाकडून आयफोन तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.

iPhone-13

महसूल गुप्तचर संचालनालयाकडून आयफोन तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

महसूल गुप्तचर संचालनालयाने देशात तस्करी होत असलेल्या आयफोनचा साठा पकडला आहे.iPhone-13

अचूक गुप्तचर माहितीच्या आधारावर, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी 26.11.2021 रोजी दोन मालाची तपासणी केली. हा माल हॉंगकाँगहून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर कार्गो कॉम्प्लेक्स (ACC), आला होता. आयात मालाच्या दस्तऐवजांमध्ये हा माल “मेमरी कार्ड” म्हणून जाहीर करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्ष तपासणीत असे दिसून आले की मालामध्ये खालील वस्तू होत्या-

Description Quantity
iPhone 13 Pro 2,245
iPhone 13 Pro Max 1,401
Google Pixel 6 pro 12
Apple Smart Watch 1

अशा प्रकारे, रोखलेल्या मालामध्ये एकूण 3,646 (तीन हजार सहाशे सेहेचाळीस) आयफोन-13 मोबाईल फोन सापडले. कागदपत्रात नमूद न केलेले वर उल्लेख केलेले मोबाईल फोन आणि ऍपल स्मार्ट घड्याळ,या वस्तू सीमा शुल्क कायदा, 1962 अंतर्गत जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे रु. 42.86 कोटी रुपये होती तथापि मालाचे घोषित मूल्य फक्त 80 लाख रुपये होते.

आयफोन 13 मॉडेल सप्टेंबर 2021 पासून भारतात विक्रीसाठी आले, ज्याची मूळ किंमत रु. 70,000/- रुपये होती आणि काही उच्च श्रेणीतील मॉडेल्सची किंमत 1,80,000 रुपये होती. भारतात मोबाईल फोन्सच्या आयातीवर 44% प्रभावी सीमाशुल्क लागू होते.

तस्कर आयफोन 13 सारख्या नवीनतम उत्पादनांसाठी त्यांचे तस्करीचे नेटवर्क किती लवकर प्रस्थापित करतात हे या अत्याधुनिक मॉडेल्सच्या फोनच्या इतक्या मोठ्या प्रमाणावरील तस्करीच्या प्रयत्नातून आढळून येते. या शोधामुळे एक गंभीर आयात फसवणूक उघडकीस आली आहे, ज्यामुळे लक्षणीय महसूल परिणाम दर्शवणाऱ्या तस्करीच्या अनन्य आणि अत्याधुनिक पद्धती शोधून त्यांचा मुकाबला करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाची क्षमता अधिक मजबूत झाली आहे. देशाच्या आर्थिक सीमांचे रक्षक म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालय तस्करीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *