सुप्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचा “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार प्रदान

Prasoon Joshi receives Indian Film Personality of the Year Award for 2021

सुप्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचा “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार प्रदान.

“युवा कलावंतांनीं मनातील गोंधळालाही जपले पाहिजे , कारण अनेकदा या गोंधळातूनच उत्तम कल्पनांचा जन्म होतो.”

‘उद्याची 75 सर्वोत्तम प्रतिभावान मने’ देशासाठी नक्कीच काही आशादायी कार्य करून दाखवतील ही खात्रीच आज माझ्या मनाला उभारी देते आहे.

कुंडीतील झाडांकडून मिळणाऱ्या तत्वज्ञानापेक्षा मोकळ्या हवेत वाढणाऱ्या वटवृक्षाकडून मिळालेले ज्ञान मी जास्त महत्वाचे मानतो असे सांगत देशात सुरु असलेल्या संघर्षांशी चित्रकर्मींनी बांधिलकी ठेवण्याचे प्रसून जोशी यांचे आवाहन केले

“एक आसमान कम पड़ता है, और आसमान मंगवा दो,

है बेसब्रा  उड़ने में , मेरे पंख नीले रंगवा दो,

स्वप्न करोड़ों सत्य हो रहे है , अब उन का सत्कार करो,

निकल पड़ा है भारत मेरा , अब तुम जयजयकार करो.”

अर्थात …. “एक आकाश कमी पड़त असेल, तर आणखी एक आकाश आणा …..” प्रसिद्ध गीतकार आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी या पंक्ती उद्घृत केल्या  .Prasoon Joshi receives Indian Film Personality of the Year Award for 2021

गोवा येथे झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात सुप्रसिध्द  गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचे “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यानंतर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . चित्रपट क्षेत्राबरोबरच संस्कृती आणि सामाजिकदृष्टीने महत्वपूर्ण कलात्मक कार्यामध्ये प्रसून जोशी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा प्रतिष्ठित सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

प्रसून जोशी यांनी विविध चित्रपटांसाठी गीतलेखन केले असून त्यांची काही गीत खूप गाजली. यामध्ये तारे जमीं पर, रंग दे बसंती, हम तुम, फना, आकर्षण, दिल्ली 6, गजनी, नीरजा, मनकर्णिका या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक चित्रपटांमधली जोशी यांची गाणी लोकप्रिय ठरली आहेत.यावेळी  त्यांनी युवा कलाकारांना मनातील गोंधळालाही जपले जपण्याचे आवाहन केले आणि ते पुढे म्हणाले की या अनेकदा या गोंधळातूनच उत्तम कल्पनांचा जन्म होतो.

उत्तम चित्रपट बनवण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो, म्हणूनच असे शॉर्ट कट घेऊन आपल्याला काहीतरी घडवता येईल या भ्रमात चित्रकर्मींनी राहू नये.  असे त्यांनी उगवत्या चित्रकर्मींना सांगितले.

कुंडीतील  झाडांकडून मिळणाऱ्या तत्वज्ञानापेक्षा मोकळ्या हवेत वाढणाऱ्या वटवृक्षाकडून मिळालेले ज्ञान मी जास्त महत्वाचे मानतो असे सांगत देशात सुरु असलेल्या संघर्षांशी चित्रकर्मींनी बांधिलकी ठेवण्याचे प्रसून जोशी यांचे  आवाहन केले.

“देशातील विविधतेला चित्रपटांमध्ये प्रतिबिंबित होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे” , असेही  ते म्हणाले.

“‘उद्याची  ७५ सर्वोत्तम प्रतिभावान मने’ हा नवा पुरस्कार म्हणजे या वर्षीच्या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे”, असे ते म्हणाले . “यावर्षीचा इफि म्हणजे केवळ पुरस्कार सोहोळा न राहता खऱ्या अर्थाने महोत्सव झाला आहे, देशातील ‘उद्याची  ७५ सर्वोत्तम प्रतिभावान मने’ देशासाठी नक्कीच काही आशादायी कार्य करून दाखवतील ही  खात्रीच आज माझ्या मनाला उभारी देते आहे”.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’  पुरस्कार मिळल्याबद्दल  प्रसून जोशी यांची प्रशंसा केली आणि “‘उद्याची  ७५ सर्वोत्तम प्रतिभावान मने’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चा फलदायी ठरल्या असे सांगितले.

उत्तराखंडमधील अल्मोडासारख्या छोट्याशा शहरारातून  मी आलो आहे, माझ्या कामाला या पुरस्काराने ही एकप्रकारची मान्यता मिळाली आहे, याबद्दल मी इफ्फीचा आभारी आहे. महामारीच्या आव्हानात्मक वर्षातही महोत्सवाचे आयोजन करून चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन दिल्याबद्दल इफ्फीचे मनापासून अभिनंदन करतो. हा पुरस्कार मी माझे प्रेरणास्त्रोत असलेल्या उत्तराखंडला आणि भारतातल्या सर्व युवा सर्जनशील मनांना समर्पित करतो. लहानशा गावांमधून शहरात काही वेगळे करून, मोठा प्रभाव पाडण्यासाठी  मला प्रेरणा कदाचित त्यांच्यामुळेच मिळाली असेल.’’

प्रसून जोशी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जाहिरात व्यावसायिक आहेत. सध्या ते जगातल्या सर्वात मोठ्या जाहिरात कंपन्यापैकी एक असलेल्या मॅककॅन वर्ल्डग्रुपचे अशिया-पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष आहेत आणि भारतामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात आहेत. त्यांना कान्स येथे गोल्डन लायन पुरस्कार मिळाला आहे, तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने त्यांना ‘यंग ग्लोबल लीडर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

इफ्फीच्या समारोप सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अभिनेता मनोज वाजपेयी ,अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.

इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये या पुरस्काराच्या अन्य मानकरी  भारतीय चंदेरी दुनियेची ड्रीम गर्ल हेमामालिनी यांना “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  इतर सन्मान प्राप्तकर्त्यांमध्ये अमेरिकन चित्रपट निर्माते स्कॉर्सेस आणि हंगेरियन चित्रपट निर्माते इस्टवॅन झॅबो यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *