Maharashtra Board SSC Exam Cancelled, written order issued.
Education Minister Varsha Gaikwad announced the cancellation of the Class X examination on the backdrop of corona infection. This was creating some technical difficulties. In the academic year 2020-21, the board exam schedule for the Class X examination was announced from April 29 to May 20 instead of February-March. 16 lakh students had registered for the exam. The CBSE ICSE board canceled their matriculation exams due to Corona. On April 20, School Education Minister Varsha Gaikwad announced the decision to cancel the Maharashtra Board’s Class X examination, but no written order was issued.
It has also been clarified that due to the cancellation of the examination, orders will be issued regarding the issuance of marks/certificates and the admission process for the eleventh. So while student parents are relieved however there is a possibility of some parents going to court against the decision to cancel the exam cannot be ruled out.
The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has announced the cancellation of the Class X examination on Wednesday, May 12. Meanwhile, the letter of order was issued by Rajendra Pawar, Deputy Secretary, School Education Department. Written orders to cancel have been issued by the school education department on Wednesday the 12th. https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions In this connection, Secretary Rajendra Pawar informed that appropriate action should be taken to make necessary changes in the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Exchange 1977.
महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा रद्द, लेखी आदेश जारी.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कागदोपत्री जाहीर न झाल्याने विद्यार्थी पालक शिक्षक संभ्रमावस्थेत होते. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च ऐवजी दिनांक २९ एप्रिल ते २० मे दरम्यान परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले होते . या परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोनामुळे सीबीएससी(CBSE ) आयसीएससी (ICSE ) बोर्डानी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्याबरोबर महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 20 एप्रिल रोजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला ,मात्र याबाबत लेखी आदेश काढले गेले नव्हते.
परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत व , अकरावीची प्रवेश प्रक्रियेबाबत आदेश देण्यात येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांना दिलासा मिळाला आहे तर काही पालक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केल्याचे शालेय शिक्षण मंडळाकडून बुधवार दिनांक 12 मे रोजी जाहीर करण्यात आले. दरम्यान आदेशाचे पत्र शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढले. रद्द केल्याचे लेखी आदेश शालेय शिक्षण विभागाकडून बुधवार दिनांक 12 रोजी काढण्यात आले आहेत. https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विनिमय 1977 मध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत यथोचित कारवाई करावी अशी माहिती निर्णय सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.