मुलांसाठी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण.
विषय तज्ञ समिती (SEC) च्या बैठकीत मेसर्स भारत बायोटेकने सादर केलेल्या 2 ते 18 वर्षे वयोगटातील निरोगी स्वयंसेवकांवरील कोवॅक्सिन च्या तात्पुरत्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी डेटावर 26.08.2021 आणि 11.10.2021 रोजी चर्चा करण्यात आली. समितीने 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी विविध अटींच्या अधीन राहून आणीबाणीच्या परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी बाजार अधिकृतता देण्याची शिफारस केली. या शिफारशीची तपासणी केली जात आहे आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) स्तरावर अतिरिक्त माहितीची विनंती करण्यात आली आहे.
CDSCO ने मेसर्स कॅडिला हेल्थकेअरच्या कोविड -19 प्रतिबंधक लस (ZyCoV-D) ला देखील 12 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी मान्यता दिली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.