वैद्यकीय महाविद्यालये आणि रूग्णालयांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन.
देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि रूग्णालयांमध्ये संशोधनाला पूरक वातावरण निर्मितीचा प्रचार आणि समर्थन करण्यासाठी आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, डीएचआर म्हणजेच आरोग्य संशोधन विभाग यांच्याअंतर्गत स्वायत्त संस्था, 119 वैद्यकीय महाविद्यालये आणि रूग्णालयांमध्ये संशोधनपर उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर आरोग्य संशोधन विभागाकडून विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध 92 बहुविध-विषय संशोधन विभाग आणि 118 विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालये आणि रूग्णालयांमध्ये स्पर्धात्मक आरोग्य संशोधन आणि अुनदानातून मनुष्य बळ विकास योजनेअंतर्गत पाठिंबा देण्यात येत आहे.
दर्जेदार आणि कालबद्ध संशोधन व्हावे आणि त्याचे चांगले परिणाम दिसून यावेत, संशोधन क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या कामकाजात वाढ व्हावी, यासाठी नोडल प्रयोगशाळांसह बहुकेंद्रीत प्रकल्प सुरू करण्यात येतात. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदांच्या कामांचे समन्वय केले जाते.
सरकारकडे संशोधन कार्याला दिलेले, मंजूर झालेले अनुदान आणि मनुष्य बळ विकास योजनांचे वर्षासाठी तयार केलेले प्रकल्प तसेच संशोधकांची माहिती डीएचआरकडे उपलब्ध आहे. तसेच डीएचआर आणि आयसीएमआर यांनी वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातल्या जैव-वैद्यकीय संशोधनात कार्यरत असलेल्या महिला संशोधकांचे पोर्टलही आहे.
अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एक लेखी उत्तरामध्ये दिली.