Suryadatta Group of Institutes distributes Sanitation Pumps, 200 Corona Kits to blood donors under ‘Mission Corona Eradication’.
Under the ‘Mission Corona Eradication’, Suryadatta Group of Institutes distributed 200 Corona Safety Kits to blood donors and volunteers to encourage blood donation. City-based NGO Swatantryaveer Sawarkar Mitra Mandal held a blood donation camp recently in the Erandwane area. Suryadatta handed over three sanitation pumps to the NGO. Ram Borkar, chief of the NGO received these sanitation pumps. The kits donated contain a medicated soap, disinfectant, and face masks to fight Corona. The kits gifted to donors & volunteers will encourage people to donate blood for a cause and is a token of Thanks given by Suryadatta to donors and volunteers.
As a part of its Edu-Socio connect initiative, Suryadatta Group of Institutes regularly conducts activities for the community at large. Suryadatta has undertaken ‘Mission Corona Eradication’. Under this mission, to prevent the spread of Corona, Suryadatta donated sanitization equipment namely automated spray pumps to the social organization (Mandal). These sanitization sprays were very much needed and will be used in Erandwane and Karvenagar areas to prevent Corona.
The gesture of donating Corona kits to encourage blood donors and volunteers is a support to the community and is appreciated by the organizers of the camps and social workers. Everyone should contribute to the fight against corona. Under this mission, we are distributing kits, helping patients in form of medical help and counseling, etc. To encourage people to donate blood as well as plasma, we come forward to give corona safety kits to the blood donors and volunteers, said Dr. Sanjay Chordia.
These pumps and kits were handed over to Shri Ram Borkar, Adhyaksha of the Mandal on Monday 10th May 2021 by a team from Suryadatta. We are thankful to Dr. Sanjay Chordiya and Mrs. Sushma Chordiya for donating and supporting our cause, said Shri Ram Borkar. Suryadatta Group is a socially conscious educational institution, he further said.
As a part of the Edu-Socio connect initiative, Suryadatta’s Bavdhan campus had hosted a blood donation camp organized by Shri Ram Bangad and Bavdhan volunteers on 1st May 2021. Over 100 donors donated blood during this camp. Suryadatta had provided the venue for this camp. During this camp also, in order to encourage donors, Suryadatta distributed Corona kits to donors and volunteers. Chairman of Suryadatta Education Foundation Dr. Sanjay Chordiya, staff members including Dr. Shriprakash Soni and Shri Bhatu Patil were present for the event and provided encouragement to the team.
Prof. Sunil Dhadiwal said that It is the moral responsibility of everyone to keep their premises clean and to take everyone with them. Everyone should contribute, not just depend on the government or the municipality. Ram Borkar is working with a social spirit. This is Suryadatta’s attempt to support his work.”
मिशन कोरोना इरॅडिकेशन’अंतर्गत सूर्यदत्ता ग्रुपतर्फे तीन सॅनिटायझेशन पंप, २०० कोरोना सुरक्षा किटचे वाटप.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे ‘मिशन कोरोना इरॅडिकेशन‘ उपक्रमाअंतर्गत तीन सॅनिटायझेशन पंप, २०० रक्तदात्यांना कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. एरंडवण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाने घेतलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना आणि स्वयंसेवकांना रक्तदानास प्रोत्साहन देण्यासाठी कोरोना सुरक्षा किट वाटण्यात आले. यामध्ये औषधी साबण, जंतुनाशक (डिसइन्फ़ेक्ट स्प्रे), फेस मास्क आदींचा समावेश आहे. तसेच मंडळाच्या मागणीनुसार तीन सॅनिटायझेशन पंप भेट देण्यात आले.
एरंडवणे, कर्वेनगर व परिसरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे पंप वापरले जाणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष राम बोरकर यांच्याकडे हे पंप सुपूर्त करण्यात आले. ‘सूर्यदत्ता चे कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, अधिष्ठाता प्रा. नूतन जाधव, प्रा. नयना गोडांबे आदी उपस्थित होते. राम बोरकर यांनी यांनी या सहकार्याबद्दल ‘सूर्यदत्ता‘चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्ष–सचिव सुषमा चोरडिया यांचे आभार मानले. शिक्षणासोबतच सामाजिक जाणिवेतून काम करणारी ही शिक्षणसंस्था आहे, असल्याचे बोरकर यांनी सांगितले.
“कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी आपण प्रत्येकाने योगदान द्यायला हवे. मिशन कोरोना इरॅडिकेशन उपक्रमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासह समुपदेशन, औषधोपचार मार्गदर्शन आदी गोष्टी करण्यात येत आहेत. सध्याच्या काळात रक्ताची, प्लाझ्माची मोठी गरज भासत असून, त्यासाठी शिबिरे व्हावीत, रक्तदान व्हावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून कोरोना सुरक्षा किटचे रक्तदात्यांना, शिबिरातील स्वयंसेवकांना वाटण्यात येत आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
सूर्यदत्ता एज्यु–सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह च्या माध्यमातून हा ‘मिशन कोरोना इरॅडिकेशन‘ उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून ‘सूर्यदत्ता‘च्या बावधन कॅम्पसमध्येही महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रक्ताचे नाते संस्थेचे राम बांगड आणि बावधन परिसरातील लोकप्रतिनिधी–स्वयंसेवकांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन केले. येथे १०० पेक्षा जास्त दात्यांनी रक्तदान केले होते. येथेही ‘सूर्यदत्ता‘च्या वतीने कोरोना सुरक्षा किट वाटण्यात आले. ‘सूर्यदत्ता‘चे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्यासह प्रा. डॉ. श्रीप्रकाश सोनी, भाटु पाटील उपस्थित होते.
प्रा. सुनील धाडीवाल म्हणाले, “आपला परिसर स्वच्छ ठेवणे व सर्वांना बरोबर घेऊन जाणे हे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. केवळ सरकारी यंत्रणा किंवा महापालिकेवर अवलंबून न राहता आपण प्रत्येकाने आपले योगदान द्यावे. राम बोरकर हे सामाजिक भावनेतून काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठबळ देण्याचा सूर्यदत्ताचा हा प्रयत्न आहे.”