विविध प्रकारचे साथीचे आजार हाताळण्यासाठी डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचारी वर्गाला विशेष प्रशिक्षण
कोविड-19 च्या सुरुवातीपासून, देशभरातील सुमारे 14 लाख वापरकर्त्यांनी या मंचावर नोंदणी केली आहे, विविध अभ्यासक्रमांसाठी 29.29 लाखांची नोंदणी झाली आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारांमार्फत 80 लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड संबंधित विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि एआयआयएमएस (नवी दिल्ली), एनआयएमएचएएनएस, पीजीआयएमईआर, जेआयपीएमईआर इत्यादी नामांकित संस्थांद्वारे कोविड संबंधित विविध विषयांवरील वेबिनार आणि मार्गदर्शक सत्रेही अपलोड करण्यात आली होती. 2.23 कोटी दर्शकांनी ते पाहिले.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एमएमसी) दिलेल्या माहितीनुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमात साथीच्या आजारांच्या व्यवस्थापनावर पूर्वीच्या भारतीय वैद्यकीय परिषदेच्या, प्रशासकीय मंडळाद्वारे (बीओसी-एमसीआय) ऑगस्ट, 2020 मध्ये सक्षमता-आधारित मॉड्यूल सादर केले गेले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.