The grazing Land of Holkarwadi will bloom in green forestry.
About 43000 native trees will be planted on 30 hectares of grazing land in Holkarwadi Gram Panchayat. This initiative will be implemented under the comprehensive forestry campaign of the social forestry department. The Bhoomi pooja ceremony was held at the hands of Sarpanch Pragya Zambare. Social Forestry Department Forest Range Officer Deepak Khalane, Forest Circle Officer Dhananjay Shirodkar, Forest Ranger Tanaji Jadhav, Former Sarpanch Govind Zambare, Former Sarpanch Datta Holkar, Ajay Zambare, Gramsevak Vijay Pawar were present on the occasion.
These mainly include Karanj, Neem, Tamarind Tree, Banyan Tree, Pipal, Hog-plum, Flame tree, Pimparani, Soap Tree, Sandal tree, cherry tree, etc. This initiative will lead to water and soil conservation along with trees. Currently, deer, rabbits, wolves, mongooses, and a variety of birds are found here. Forestry will also help in the conservation of animals.
Deepak Khalane, Forest Range Officer Social Forestry Pune Division.
The work of digging pits for tree planting has started in grazing land. They will then be filled with soil and after the first rains, seeds and seedlings will be planted where necessary. For the first three years after planting, the social forestry department will take care of these trees. After that maintenance will be done by Gram Panchayat.
होळकरवाडी च्या गायरानात फुलणार वनराई.
होळकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील 30 हेक्टर गायरान जमिनीवर सुमारे 43 हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या भरगच्च वनीकरण या अभियाना अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सरपंच प्रज्ञा झांबरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे भूमिपूजन झाले. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक खलाणे, वन परिमंडळ अधिकारी धनंजय शिरोडकर, वनरक्षक तानाजी जाधव , माजी सरपंच गोविंद झांबरे माजी सरपंच दत्ता होळकर, अजय झांबरे, ग्रामसेवक विजय पवार आदी यावेळी उपस्थित होते.
प्रामुख्याने करंज, कडूनिंब, वड, पिंपळ, आवळा पळस, पिंपरणी, रिठा चंदन, बोर आदी प्रकारच्या वृक्षांचा समावेश यामध्ये आहे. या उपक्रमामुळे वृक्षांत बरोबरच जल व मृदा संवर्धन होणार आहे. सध्या येथे हरिण, ससा, लांडगा, मुंगूस असे प्राणी व विविध प्रकारचे पक्षी आढळतात वनीकरण यामुळे प्राण्यांचेही संवर्धन होण्यास मदत होणार आहे.
दीपक खलाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण पुणे विभाग
गायरानात वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर ते मातीने भरले जातील आणि पहिल्या पावसानंतर येथे आवश्यक तेथे बीया व रोपांची लागवड करण्यात येणार आहे. लागवडीनंतर चे पहिले तीन वर्षे सामाजिक वनीकरण विभाग या वृक्षांची निगा व जोपासना केली जाणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून देखभाल करण्यात येणार आहे.