Soon Multispeciality  Hospital at Hadapsar

Hadapsar will have a well-equipped hospital. Information of MP Dr. Kolhe.

A few days back, MLA  Chetan Tupe along with Additional Commissioner Rubel Agarwal visited Annasaheb Magar Hospital, proposed to set up a multispeciality hospital there. The police office on the site of Annasaheb Magar Hospital in Hadapsar has now been shifted. So the way is now open to start a multispeciality hospital in this space.  

 Considering the danger of the third wave of the corona, 200 beds with ten beds will be made available for children at this place, said MP Dr. Amol Kolhe. He was speaking at a recent visit to the hospital,  MLA Chetan Tupe, former Deputy Mayor Nilesh Magar, Corporator Vaishali Bankar, Pooja Kodre, Dr. Shantanu Jagdale, Amol Harpale, Avinash Kale, Dr. Snehal Kale were present.

 The plan of the hospital has been submitted to the Additional Commissioner. The people’s representatives have shown readiness to provide the necessary funds for the work of the hospital. The municipal administration has responded positively to this proposal. Rs. 46 lakh will be provided from my MLA fund for the hospital.

Chetan Tupe.

Dr. Kolhe said an already well-equipped multispeciality hospital was needed in the Hadapsar area. At present, citizens have to rely on private hospitals for medical treatment, so we are working with Tupe to set up a well-equipped municipal multispeciality hospital in Hadapsar. After a year-long pursuit, the place has come under the control of the police. A 200-bed multispecialty hospital will be set up in the area in two phases. In the first phase, a building will be constructed and the existing hospital will be relocated. The rest of the building will be constructed after that, he said.

हडपसरला होणार सुसज्ज हॉस्पिटल. खासदार डॉक्टर कोल्हे यांची माहिती. मगर   रुग्णालयाची पाहणी.

काही दिवसापूर्वीच आमदार चेतन तुपे यांनी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याबरोबर अण्णासाहेब मगर रुग्णालयाला भेट देऊन तेथे मल्टिस्पेसिलीटी हॉस्पिटल उभे करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.  हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयाच्या जागेत असलेल्या पोलीस कार्यालयाचे आता स्थलांतर झाले आहे.  त्यामुळे या जागेत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

 कोरोनाचा तिसरा लाटेचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी लहान मुलांसाठी दहा बेड सह 200 बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,  अशी माहिती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली.  डॉक्टर कोल्हे  यांनी नुकतीच पाहणी केली यावेळी ते बोलत होते.  आमदार चेतन तुपे , माजी उपमहापौर निलेश मगर , नगरसेविका वैशाली बनकर,  पूजा कोद्रे  डॉक्टर शंतनू जगदाळे, अमोल हरपळे, अविनाश काळे, डॉक्टर स्नेहल काळे आदी उपस्थित होते . 

 अतिरिक्त आयुक्तांना रुग्णालयाचा आराखडा सादर केला आहे.  हॉस्पिटलच्या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी दर्शवली आहे.  या प्रस्तावाला महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हॉस्पिटल साठी 46 लाख रुपये माझ्या  आमदार निधीतून दिले जाणार आहे. 

आमदार चेतन तुपे.

डॉक्टर कोल्हे म्हणाले हडपसर परिसरात यापूर्वीच सुसज्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणे गरजेचे होते.  सध्या वैद्यकीय उपचारांसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळे हडपसर परिसरातील महापालिकेचे सुसज्ज मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी  तुपे यांच्यासह आमचे प्रयत्न सुरू आहेत.  वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांकडे जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे.  या जागेमध्ये दोन टप्प्यात 200 बेडचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारले  जाणार आहे.  पहिल्या टप्प्यात एक इमारत बांधून त्यात सध्याच्या रुग्णालायचे  स्थलांतर  केले जाईल.  त्यानंतर उर्वरित टप्प्यातील इमारत उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *