देखो अपना देश या मालिकेअंतर्गत ‘महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरे’ या विषयावर वेबिनारचे आयोजन.

Ministry of Tourism, Dekho Apna Desh

पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देखो अपना देश या मालिकेअंतर्गत ‘महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरे’ या विषयावर वेबिनारचे आयोजन.Ministry of Tourism, Dekho Apna Desh

पर्यटन मंत्रालय आपल्या देखो अपना देश उपक्रमांतर्गत विविध पर्यटन केंद्रित विषयांवर, संकल्पनांवर  वेबिनार आयोजित करत आहे. “75 डेस्टिनेशन्स विथ टूर गाईड्स” अंतर्गत आज 11 डिसेंबर 2021 रोजी ‘महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरे’ यावर  वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.  प्रादेशिक स्तरावरील गाईड  उमेश नामदेव जाधव यांनी हे वेबिनार सादर केले.

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने लोकप्रिय आणि  धार्मिक व अध्यात्मिक ठिकाणे आहेत जी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि औंढा नागनाथ ही महाराष्ट्र राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिकच्या दक्षिण पश्चिमेस सुमारे 28 किमी अंतरावर स्थित आहे आणि ते चार ठिकाणांपैकी एक आहे जिथे  सिंहस्थ मेळा (कुंभमेळा) आयोजित केला जातो,  जो संपूर्ण भारतातून लोकांना आकर्षित करतो.

भीमाशंकर मंदिर हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील एक प्राचीन शिवमंदिर आहे, जे संपूर्ण भारतातील  भाविकांना आकर्षित करते. पुणे जिल्ह्यात वसलेले हे भारतातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे भीमा नदीचे उगमस्थान देखील आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे औरंगाबाद येथे आहे, हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. त्याला घुष्मेश्वर असेही म्हणतात. पुरातत्वशास्त्रीय प्राचीनता

11 व्या-12 व्या शतकातील आहे. शिवपुराण आणि पद्म पुराण यांसारख्या पुराण साहित्यात या मंदिराच्या नावाचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे 13 व्या शतकातील मंदिर आहे. औंढा नागनाथ हे उत्कृष्ट ज्योतिर्लिंग मानले जाते. हे पांडवांनी उभारलेले  पहिले किंवा ‘आद्य ‘ लिंग मानले जाते.

परळी वैजनाथच्या ज्योतिर्लिंग मंदिराला वैद्यनाथ असेही म्हणतात आणि त्याचा जीर्णोद्धार राणी अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. हे मंदिर टेकडीवर दगडांचा वापर करून बांधले आहे.

देखो अपना देश वेबिनार मालिका इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल ई गव्हर्नन्स विभागाच्या तांत्रिक भागीदारीत सादर केली जाते. वेबिनारची सत्रे आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured आणि भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहेत.

पुढील वेबिनारबद्दल जाणून घेण्यासाठी भेट द्या  :

फेसबुक – https://www.facebook.com/incredibleindia/

इंस्टाग्राम – https://instagram.com/incredibleindia?igshid=v02srxcbethv

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *