Now vaccination will be smooth. Soon the mess at the vaccination center will be over. The Municipal Corporation issued regulations for vaccination.
Municipal Commissioner Vikram Kumar, who has issued vaccination regulations to curb the use of tokens given by activists for corona vaccination and the resulting confusion at the center after vaccination. This will reduce the interference of the leaders’ activists and ensure the smooth running of the vaccination process. Now health workers will only admit those who come for vaccination online and offline to the vaccination center. In addition, the local police station near the vaccination center has been given the responsibility to prevent congestion at the vaccination center.
The type of confusion at some centers was increasing day by day after the vaccination campaign started. Due to insufficient availability and high demand for vaccines, the vaccination center was crowded. Also, many citizens were suffering due to the non-availability of vaccines. The number of complaints from citizens was high. In the vaccination campaign, politics was in a state of turmoil. Due to this, the commissioner has issued regulations and ordered its strict implementation to ensure smooth vaccination and control the incidence of the corona. Those who interfered with the vaccination center have been ordered to file a case of obstruction of government work.
Priority has been given to the first disabled person at the vaccination center.
Then the beneficiaries of the second dose,
then the senior citizens,
the beneficiaries of the first dose booked online,
and finally, the citizens who went on the spot will have to pay the first dose.
Only those who have registered online on the Covin portal for vaccination and who have come to the vaccination center themselves to get vaccinated will now have access to the vaccination center. It will be mandatory for them to have two separate queues. The vaccine cannot be given without registering on the Covin portal. Vaccination will now be done at the designated place. Health workers want to make sure that the vaccine is not wasted. The Commissioner has the power to increase or decrease the number of centers. Vaccination will start at 10 am at each center, such instructions were given in the issued regulations for vaccination.
Now that the regulations for vaccination have been issued, there is no reason to expect that the vaccination campaign will go smoothly.
लसीकरण होणार सुरळीत . लसीकरण केंद्रातील गडबड गोंधळ होणार बंद.
कोरोना प्रतिबंधक लसीसाठी कार्यकर्ता कडून दिले जाणारे टोकन आणि त्यामुळे लसीकरण केल्यावर केंद्रावर होणार गोंधळ, यावर निर्बंध आणण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यानी लसीकरणाची नियमावली जारी केली आहे. यामुळे नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप कमी होऊन लसीकरण प्रक्रिया सुरळीत चालू राहील. आता आरोग्य कर्मचारी, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने लसीकरणासाठी आलेल्यांनाच, लसीकरण केंद्रावर प्रवेश देतील. याशिवाय लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्राजवळ असलेल्या स्थानिक पोलिसांकडे त्याची जबाबदारी सोपवली आहे.
लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर काही केंद्रांवर गोंधळाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत होते. लसीची अपुरी उपलब्धता आणि मागणी जास्त असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत होती. तसेच बऱ्याच नागरिकांना लस न मिळाल्याने मनस्ताप होत होता. नागरिकांचे यासंबंधीच्या तक्रारीचे प्रमाण वाढले होते. लसीकरण मोहीम राजकारणात अडकण्याची स्थिती निर्माण झाली होती. यामुळेच लसीकरण सुरळीत व्हावे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा, यासाठी आयुक्तांनी नियमावली जारी करून त्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. लसीकरण केंद्रावर हस्तक्षेप करणाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा असे आदेश देण्यात आले आहेत.
लसीकरण केंद्रावर प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे
प्रथम दिव्यांग व्यक्ती.
नंतर दुसर्या डोसचे लाभार्थी,
त्यानंतर ज्येष्ठ नागरिक,
ऑनलाईन बुकींग केले पहिल्या डोसचे लाभार्थी
आणि सर्वात शेवटी ऑन द स्पॉट गेलेल्या नागरिकांना पहिला डोस द्यावा लागणार आहे.
लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केलेले आणि जे नागरिक स्वतः लसीकरण केंद्रास लसीकरण करण्यासाठी आले आहेत त्यांनाच आता लसीकरण केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. त्यांच्यासाठी दोन स्वतंत्र रांगा ठेवणे बंधनकारक असणार आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय लस देता येणार नाही. ठरवून दिलेल्या ठिकाणी आता लसीकरण करण्यात येणार आहे. लस वाया जाणार नाही याची दक्षता आरोग्य सेवक यांनी घ्यायचे आहे. केंद्र वाढवण्याचे अथवा कमी करण्याचा अधिकार आयुक्तांकडे आहे . प्रत्येक केंद्रावर सकाळी दहा वाजता लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
आता लसीकरणासाठी नियमावली जारी केल्यामुळे लसीकरण मोहीम सुरळीत होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.