सीजीएसटी अधिकाऱ्यांकडून सनदी लेखापालाला अटक.

Goods & Service Tax हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

92 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केल्याप्रकरणी सीजीएसटी अधिकाऱ्यांकडून सनदी लेखापालाला अटक.Goods & Service Tax

92 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करून मालाच्या खऱ्या पावतीशिवाय 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त  बनावट देयक पावत्या तयार केल्याप्रकरणी  ठाणे (ग्रामीण) च्या सीजीएसटी अधिकार्‍यांनी  सनदी लेखापालाला अटक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी एका गृहिणीच्या   ओळखीचा वापर करून अंबरनाथ (ठाणे) येथे मेसर्स श्रद्धा इलेक्ट्रिकल.नावाची कंपनी तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या सनदी लेखापालासह  काही व्यक्ती माल कोणत्याही ठिकाणी न हलवता, बनावट आयटीसी तयार करण्याच्या टोळीमध्ये गुंतल्याचे आणि तो पुढे  पाठवत असल्याचे तपासातून  समोर आले आहे.अधिकाऱ्यांनी सनदी लेखापालाला   14 डिसेंबर 2021 रोजी दुपारी सीजीएसटी  कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक केली. त्याला मुंबईच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर  हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून  पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *