डिजी यात्रा योजनेचा पहिला टप्पा निवडक विमानतळांवर 2022 मध्ये सुरु करण्याची योजना.
पुण्यासह भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चार विमानतळ आणि संयुक्त उपक्रमातील तीन विमानतळांनी डिजी यात्रा बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीची प्राथमिक चाचणी पूर्ण केली आहे.
वाराणसी, पुणे, कोलकाता आणि विजयवाडा हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (AAI) चार विमानतळ आणि हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (HIAL), बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL), आणि दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) या तीन संयुक्त उपक्रमातील विमानतळांनी केवळ ‘प्रवासाच्या दिवसासाठी’ नोंदणीसह डिजी यात्रा बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीची प्राथमिक चाचणी पूर्ण केली आहे. यामुळे विमानतळ, विमान कंपन्या इत्यादींच्या संसाधनांचा योग्य वापर होईल. डिजी यात्रा सेंट्रल इको-सिस्टम वेगवान आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आंतरपरिचालनासाठीआयएटीए ( IATA) ट्रॅव्हल पासच्या जागतिक प्रक्रियेशी सुसंगत आहे.
डिजी यात्रा योजना विविध विमानतळांवर टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात, 2022 मध्ये निवडक विमानतळांवर ही योजना राबवली जाईल.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुढील 4-5 वर्षात नवीन विमानतळांचा विकास आणि विद्यमान विमानतळांचा विस्तार/सुधारणा करण्यासाठी 25,000 रुपये गुंतवणुकीची योजना हाती घेतली आहे. यामध्ये विद्यमान टर्मिनल्सचा विस्तार आणि सुधारणा, नवीन टर्मिनल्सची स्थापना, विद्यमान धावपट्टी, ऍप्रन, विमानतळ दिशादर्शक सेवा (ANS), कंट्रोल टॉवर्स, तांत्रिक ब्लॉक्स इत्यादींचा विस्तार किंवा मजबुतीकरण यांचा समावेश आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री (जनरल (डॉ) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.