The state government is making efforts to provide the right house to the common man.

The state government is making efforts to provide the right house to the common man.

– Deputy Chief Minister Ajit Pawar.

     Through the state government, work is underway to provide quality and affordable housing to the common man. Stating that the state government is making efforts to provide the right house to all by 2022, the citizens should participate in this process and make appropriate suggestions. Deputy Chief Minister and Guardian Minister of Pune District Ajit Pawar stated that such improvements will be made keeping in view these suggestions.

          In Pimpri Chinchwad Navanagar Vikas Pradhikaran, Peth No. 12, Akurdi, 3 thousand 117 for the low-income group and 1 thousand 566 for the low-income group for 4 thousand 883 flats were taken out online by Deputy Chief Minister Ajit Pawar. He was talking at the time. On this occasion, District Collector and Vice

Ajit Pawar
A total of 4,883 flats developed by the Pimpri Chinchwad Navanagar Development Authority under the Pradhan Mantri Awas Yojana at Peth No. 12, Akurdi were taken out online by Deputy Chief Minister Ajit Pawar.

President of Pimpri-Chinchwad Navanagar Development Authority Dr. Rajesh Deshmukh, Pune Metropolitan Region Development Authority Chief Executive Officer Suhas Divase, Pimpri-Chinchwad Navanagar Development Authority Chief Executive Officer Bansi Gawli along with senior officers of the concerned department were present.    

        Deputy Chief Minister Ajit Pawar said, “Everyone has a dream to have their own home.” In this draw, those whose dream of housing has not been fulfilled, should not be disappointed, should apply again in the next lottery process, work is underway through the government to get the dream home of the common man, saying that their dream of a house will also come true. The process of providing houses is computerized and highly transparent. Deputy Chief Minister Ajit Pawar said that there is no room for any kind of vandalism in this.

         The program was introduced by Pimpri-Chinchwad Navanagar Development Authority Chief Executive Officer Bansi Gawli and the vote of thanks was given by Deputy Chief Executive Officer Asharani Patil.

सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील

– उपमुख्यमंत्री अजित पवार.

  

राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. 2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून, नागरिकांनी या प्रकियेमध्ये सहभागी होऊन योग्य त्या सूचना कराव्यात. या सूचना लक्षात घेऊन तशा सुधारणा करण्यात येतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

          येथील अल्पबचत सभागृहात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक 12, आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी 3 हजार 117 व अल्प उत्पन्न घटकांसाठी 1 हजार 566 असे एकूण 4 हजार 883 सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी ते

Ajit Pawar
पुणे येथील अल्पबचत सभागृहात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत पेठ क्रमांक 12, आकुर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या एकूण 4 हजार 883 सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आली.

बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

        उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकांचे स्वप्न असते. या सोडतीमध्ये ज्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले नाही, त्यांनी निराश होऊ नये, पुढच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये परत अर्ज करावेत, आपलेही घराचे स्वप्न पुर्ण होईल असे सांगून सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काम सुरु आहे. घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया संगणकीय असून अत्यंत पारदर्शक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशाराणी पाटील यांनी केले.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *