The information of the children who have lost both their parents due to Covid-19 should be given on helpline number 1098-Resident Deputy Collector Dr. Jayashree Katare’s appeal to the people.
Resident Deputy Collector Dr. Jayshree Katare has appealed to the citizens to give information about the care of children who have lost both their parents due to Covid-19. A Task Force has been constituted at the district level to ensure the safety of the children who have lost their parents due to CoVID-19 and to ensure proper care and remedial treatment of the children whose parents have lost their rights. The meeting of the task force was held under the chairmanship of Resident Deputy Collector Dr. Jayashree Katare, during which he was speaking. The meeting was attended by Deputy Commissioner of Police Mitesh Ghatte, Women and Child Development Officer Ashwini Kamble, senior officers of the concerned department, and officials of NGOs.
Detailed information of children who have lost both their parents due to Kovid-19 disease should be made available. Resident Deputy Collector Dr. Katare further said that action should be taken against the missing parents through the District Legal Services Authority and Child Welfare Committee to get their financial and property rights as well as legal rights. These children should be given the benefit of a childcare scheme as per their need. He also suggested that counseling should be arranged for these children and if the adoption process is required, action should be taken as per the prevailing guidelines.
Deputy Commissioner of Police Shri. Ghatte said that children who have lost both their parents due to Kovid-19 disease will not go to juvenile delinquency, such children will not be exploited, they will not be appointed as child laborers and necessary action will be taken by the police against those who commit such criminal acts.
कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी-निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांचे जनतेला आवाहन.
कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती नागरिकांनी 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे. कोव्हिड-19 मुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांच्या संबंधी सुरक्षितेबाबत व दोन्ही पालक गमवलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृतीदल (Task Force) गठीत करण्यात आलेली आहे. या कृती दलाची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होत्या. या बैठकीला पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती उपलब्ध करुन घ्यावी, अशा सूचना करुन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे पुढे म्हणाल्या, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल कल्याण समिती यांच्यामार्फत त्यांचे आर्थिक व मालमत्ता विषयक तसेच कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी. या बालकांना आवश्यकतेनुसार बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा. या बालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करावी व दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.
पोलीस उपायुक्त श्री. घट्टे म्हणाले, कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालके बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणार नाहीत, अशा बालकांचे शोषण होणार नाही, बालकामगार म्हणून त्यांची आस्थापनेवर नेमणूक होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाईल तसेच असे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर आवश्यक ती पोलीस विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल.