संगीत रसिकांसाठी ‘संगीत आस्वाद’ अभ्यासक्रम.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मिळणार प्रमाणपत्र.
पुणे: संगीत कसे ऐकावे, संगीताचा आस्वाद कसा घ्यावा यासाठी ‘संगीत आस्वाद’ याबरोबरच ‘मराठी ललित संगीत’ ,असे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पुढाकारातून लवकरच सुरू होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र व महाराष्ट्र कल्चरल सेंटर या पुण्यातील प्रसिध्द संगीत संस्थेच्या माध्यमातून संगीत विषयक दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले जाणार आहेत. ‘मराठी ललित संगीत’ हा पाच महिन्यांचा अभ्यासक्रम असून त्यात मराठी भावगीत, नाटयगीत, लावणी, इ. शब्दप्रधान संगीताचे प्रात्यक्षिक शिक्षण दिेले जाणार आहे. तर ‘संगीत आस्वाद’ हया चार महिन्यांच्या अभ्यासक्रमात संगीत ऐकावे कसे, त्याचा आस्वाद कसा घ्यावा याविषयीचे मार्गदर्शक दिले जाईल. हया दोन्ही लघुअवधी अभ्यासक्रमांचे संयोजन महाराष्ट्र कल्चरल सेंटर करत आहे, व सहभागी विद्यार्थ्यांस अभ्याक्रमाच्या अंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
अभ्यासक्रम प्रत्यक्ष होणार असून अवश्यकतेनुसार ऑनलाईन माध्यमातूनही आयोजित होतील. दि.२५ डिसेंबर २०२१ ही प्रवेश अर्जाची अंतिम मुदत असुन दि. ३ जानेवारी २०२२ पासून अभ्यासक्रम सुरु होतील.
अभ्याक्रमाचे वर्ग आठवडयातील सोमवार, बुधवार, शुक्रवार, असे तीन दिवस ज्योत्सना भोळे सभागृह येथे होतील. ‘मराठी ललित संगीत’ अभ्यासक्रमाचे वर्ग सायंकाळी ५ ते ७ तर ‘संगीत आस्वाद’ चे वर्ग सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होतील, अशी माहिती ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी दिली.
प्रवेशअर्ज पुढील लिंकवर भरावा – https://forms.gle/UwfuecsSK3AuVWBU9