राज्यातल्या १०६ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झालं.
भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेच्या तसंच त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या, बीड जिल्ह्यातल्या १२३ ग्रामपंचायतींसाठी, तसंच धुळे, अहमदनगर आणि नांदेड -वाघाळा या तीन महानगरांमधील प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान झालं. त्यापैकी काही ठिकाणच्या मतदानाच्या टक्केवारीची प्राथमिक आकडेवारी हाती येत आहे.
सांगली जिल्ह्यातल्या तीन नगरपंचायतींसाठी मतदान झालं, दुपारी साडे तीन वाजेपर्यंत कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत ६७ पूर्णांक ६६ शतांश टक्के आणि कडेगाव नगरपंचायतीसाठी ६७ टक्के मतदान झालं. तरुण आणि वृद्ध मतदारांनी मोठ्या उत्साहानं मतदान केलं. खानापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी शंभर वर्षाच्या आजी शांताबाई लवजी मोरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
रायगड जिल्ह्यात पाली,पोलादपूर, माणगाव, म्हसळा,तळा आणि खालापूर नागरपंचायतींसाठीही दुपारी साडेतीन पर्यंत ६५ पूर्णांक ८३ शतांश टक्के मतदान झालं.भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी साडे तीन वाजेपर्यंत ५३ पूर्णांक ६६ टक्के मतदान झालं.
धुळे जिल्ह्यात साक्री नगर पंचायत निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६४ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर, मंठा, जाफराबाद, घनसावंगी आणि तीर्थपुरी नगरपंचायत निवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये पोट निवडणूकीसाठी दुपारी साडे तीन वाजेपर्यत २७ पूर्णांक १ शतांश टक्के मतदान झालं.
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव नगरपंचायतीसाठी ७९ पूर्णांक ०४ शतांश टक्के तर अर्धापूर नगरपंचायतीसाठी ६५ पूर्णांक ५८ शतांश टक्के मतदान झालं.नंदूरबार जिल्ह्यात धडगाव नगरपंचायती साठी साडेतीन वाजेपर्यंत ७४ पूर्णांक ५८ शतांश टक्के मतदान झालं.
वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान संपेपर्यंत ७६ पूर्णांक २३ शतांश टक्के मतदान झालं आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी आणि लोहारा नगरपंचायतीसाठी मतदान झालं. वाशी नगरपंचायतीच्या तेरा जागांसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत ५१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ नगर पंचायती मध्ये शांततेत मतदान झालं.दुपारी साडे तीन वाजेपर्यंत कुडाळ नगरपंचायतीसाठी ६० पूर्णांक ४२ शतांश टक्के, वाभवे वैभववाडी नगरपंचायतीसाठी ७५ पूर्णांक शतांश ८७, कसई दोडामार्ग नगरपंचायतीसाठी ७० पूर्णांक ५३ शतांश तर देवगड जामसंडे मध्ये ६२ पूर्णांक ९७ शतांश टक्के मतदान झालं.
वर्धा जिल्ह्यात चार नगरपंचायत निवडणुकीसाठी ६३ पूर्णांक ७० शतांश टक्के मतदान झालं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीच्या सार्वत्रिक, तर नागभीड नगर परिषदेच्या पोटनिवडणुकिकरता दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सरासरी ६२ पूर्णांक ८२ शतांश टक्के मतदान झालं होतं.
गडचिरोलीत ९ नागरपंचायतींसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ७५ पूर्णांक ४१ शतांश टक्के मतदान झालं होतं. या सर्व निवडणुकांची मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.