कोविड विषाणूचा ‘ओमायक्रॉन’ हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे.

Corona-virus. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News. Hadapsar News.

कोविड विषाणूचा ‘ओमायक्रॉन’ हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय.

Omicron-Variant-The-COVID
Image By PIXABAY.COM

कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी वॉर रूम सुरु कराव्यात तसंच जिल्हा आणि स्थानिक पातळीवर तातडीनं दखल घ्यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लिहिलेल्या पत्रात दिल्या आहेत.

देशाच्या काही भागात अजूनही डेल्टा प्रकार आढळून येत आहे. त्यामुळे दूरदर्शीपणा, माहितीचा उहापोह, चांगली निर्णयक्षमता तसंच शीघ्र आणि कठोर प्रतिबंध या बाबींची स्थानिक तसंच जिल्हा पातळीवर गरज आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

कोविड – १९ विषाणूच्या प्रसाराची ताजी आकडेवारी लक्षात घेऊन परिस्थितीचा सातत्यानं आढावा घ्यावा, रुग्णालय सुविधा, मनुष्यबळ, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणं अशा बाबींवर लक्ष ठेवावं, असंही यात म्हटलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *