राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेला (NDTL) जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेची (WADA) पुनर्मान्यता.
नवी दिल्ली : राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेने (NDTL) जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेकडून (WADA) पुन्हा मान्यता मिळवली आहे. ही मान्यता पुनर्स्थापित करण्यात आल्याचे जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेने राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेला कळवले आहे. यामुळे राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेचे अमली पदार्थ विरोधी चाचण्या व इतर कार्यक्रम त्वरित अमलात येऊ शकतील.
केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका ट्विट संदेशामार्फत ही माहिती दिली. ही मान्यता पुनर्स्थापित झाल्यामुळे क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाची जागतिक कामगिरी बजावण्याच्या भारताच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाल्याचे ठाकूर यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेने (NDTL) ही मान्यता पुन्हा मिळवण्यासाठी कसून प्रयत्न केले. सप्टेंबर 2018 मध्ये प्रयोगशाळेचे तेथल्या तेथे मुल्यांकन करताना सहकार्य न केल्यावरुन जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेने (WADA) 20 ऑगस्ट 2019 रोजी ही मान्यता रद्द केली होती. राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेच्या (NDTL) प्रक्रिया आणि पद्धती या प्रयोगशाळांच्या आधुनिक आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तसेच WADAच्या तांत्रिक दस्तावेज, 2021 शी मेळ असणाऱ्या असाव्यात म्हणून जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेने (WADA) सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केले.
त्यामुळे राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेने जलदगतीने प्रगती करत आपल्या सुविधा जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेची मान्यता मिळालेल्या जगभरातील प्रयोगशाळांच्या स्तरावर आणल्या. या कामी सुधारणेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये राष्ट्रीय अमली पदार्थ सेवन तपासणी प्रयोगशाळेने राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण व संशोधन या गुवाहाटीच्या संस्थेच्या तसेच अमलीपदार्थ विरोधी विज्ञान संशोधनासाठी जम्मूतील CSIR-IIIMचे सहकार्य घेतले. आपले संशोधन कार्य व अमली पदार्थ विरोधी प्रयत्नांसाठीचे संशोधन कार्य करणाऱ्या जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी संस्थेच्या इतर प्रयोगशाळांचेही सहकार्य यासाठी मिळाले.
देशात अधिक अमली पदार्थ चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारण्यास सरकार तयार आहे. या प्रयोगशाळांमुळे अधिक नमून्यांची चाचणी करता येईल. भारताची मोठी लोकसंख्या व देशातली खेळाडूंची वाढती संख्या लक्षात घेता अशा वाढीव प्रयोगशाळांमुळे भारताला जागतीक स्तरावरील मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास मदत होईल.
क्रीडाक्षेत्रात महासत्ता बनण्याच्या भारताच्या आकांक्षेचे पुढील पाऊल म्हणून संसदेत 17 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय अमलीपदार्थ सेवन विरोधी विधेयक 2021 मांडण्यात आले.