आयएनएस सुदर्शनी आखाती देशांमध्ये.
भारताची युद्धनौका आयएसएस सुदर्शनी सध्या आखाती देशांमधील तैनातीच्या आपल्या अंतिम टप्प्यात आहे.
परदेशी मित्र नौदलाच्या प्रत्यक्ष प्रशिक्षण मंचावर नौदल अभियान तसेच प्रशिक्षणाचे विविध पैलू अवगत करण्याच्या भारतीय नौदलाच्या प्रयत्नांच्या तसेच मैत्री सेतूचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांअंतर्गत या युद्धनौकेला IRIS झेरेहद्वारे 22 डिसेंबरला जहाज ‘पोर्ट सहिद बहोनार’, बंदर अब्बास (इराण) येथे नेण्यात आले.
IRI (इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण) नौदलाने नौदल बँडने जहाजाचे उत्साहात स्वागत केले.
स्वागत समारंभानंतर इराणमधील भारताचे राजदूत गड्डाम धर्मेंद्र यांनी जहाजाला भेट दिली.
जहाज बंदर अब्बास येथे तीन दिवस तैनात असून नौदल तळाला (बंदर अब्बास) भेट आणि IRI नौदलाद्वारे नौकानयन प्रशिक्षण समाविष्ट आहे.