देशानं आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींच्या १४१ कोटींचा टप्पा पार.
दिल्ली : देशानं आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशींच्या १४१ कोटींचा टप्पा पार केल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
देशव्यापी कोविड लसीकरण मोहिमेत काल ६६ लाख ९ हजार जणांना लसीची मात्रा दिल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
कोरोनाचे ७ हजार २८६ रुग्ण काल उपचारानंतर बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४० शतांश टक्के आहे.
आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख २३ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले. देशात काल ७ हजार १८९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
तर सध्या ७७ हजार ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.