महाराष्ट्रातले शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा मंदिर जमावबंदीमुळे रात्रीच्या वेळी राहणार बंद राहणार.
महाराष्ट्रातलं शिर्डी इथलं प्रसिद्ध साईबाबा मंदिर, महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या जमावबंदी आदेशामुळे रात्रीच्या वेळी बंद राहणार आहे, अशी माहिती श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
राज्य सरकारनं २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची जमावबंदी जाहीर केल्यामुळे, मंदिरातील काकड तसेच रात्रीची नियमित आरती, प्रसादासह अनेक सुविधाही भाविकांसाठी बंद राहतील.
शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी कोविड नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केलं आहे.