येत्या ६ महिन्यात वाहन उत्पादकांनी फ्लेक्स इंधन वाहनं तसंच फ्लेक्स इंधन हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन सुरू करावं, केंद्र सरकारचा सल्ला

येत्या ६ महिन्यात वाहन उत्पादकांनी फ्लेक्स इंधन वाहनं तसंच फ्लेक्स इंधन हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन सुरू करावं, केंद्र सरकारचा सल्ला.Road Transport and Highways Minister Nitin GadkariRoad Transport and Highways Minister Nitin Gadkari

दिल्ली : येत्या सहा महिन्यात देशातल्या वाहन उत्पादकांनी फ्लेक्स इंधन वाहनं तसंच फ्लेक्स इंधन हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन सुरू करावं असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. बीएस ६ नियमांचं पालन करून कालबद्ध पद्धतीनं हे उत्पादन करा असंही सरकारनं यासंदर्भात म्हटलं आहे.

आत्मनिर्भर भारताचं प्रधानमंत्र्यांचं व्हिजन आणि परिवहन इंधन म्हणून इथेनाॉल वापराला चालना देण्यासाठी ही सूचना केल्याचं परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ट्विटरवर सांगितलं. फ्लेक्स इंधन वाहनं १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के जैव इथेनॉलच्या एकत्र वापरासाठी सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *