Sustainable solid waste and wastewater management will make the villages litter-free

Sustainable solid waste and wastewater management will make the villages litter-free, appealing to expert NGOs, companies, and producers for solid waste management.

Increasing urbanization in the district is creating a solid waste problem in the villages. For this, under Zilla Parishad, Swachh Bharat Mission, villages will be made litter-free by managing sustainable solid waste and sewage at the village level. For this, solid waste and wastewater management projects will be implemented in all the villages of the district according to the local geographical conditions. This includes waste collection, waste transportation, waste sorting, and processing of waste using traditional and modern technology to produce and sell various products.

Swacha-Bharat Abhiyan
Swachh Bharat Mission, villages will be made litter-free by managing sustainable solid waste and sewage at the village level

For this, modern technology cooperation and scientific guidance will be sought from individuals, organizations, and charitable organizations (NGOs) working in this field. Also, equipment related to solid waste management will be used. For this, information related to solid waste management equipment manufacturers and vendors will be sought.

 

For this, individuals working in the field of solid waste management, organizations, charitable organizations (NGOs) have the information and presentation of the experts they have, as well as the equipment manufacturing companies, vendors related to solid waste management, detailed information about their equipment, rates, use, technology, use. An information sheet containing information about e, and the name of the expert person giving information about it along with their contact number. Information dated 24 May 2021. The information available to them till 5.00 pm by email to nbazppune@gmail.com and Swachh Bharat Mission (G) Room, Pune Zilla Parishad, Dr. Zilla Parishad President Nirmalatai Pansare, and Chief Executive Officer Ayush Prasad has appealed to submit their presentations at Babasaheb Ambedkar Road, Camp Pune 01. According to a press release issued by Deputy Chief Executive Officer Milind Tonpe, the technology will be implemented in the villages of the district based on the information received.

शाश्वत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करुन गावे हागणदरीमुक्त करण्यात येणार,घनकचरा व्यवस्थापनाकरिता तज्ञ स्वयंसेवी संस्था, कंपनी व उत्पादकांना  आवाहन. 

जिल्हयात वाढत्या नागरीकरणामुळे गावांमध्ये घनकचरा समस्या निर्माण होत आहे. यासाठी जिल्हा परिषद, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावस्तरावर शाश्वत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करुन गावे हागणदरीमुक्त  करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हयातील सर्व गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प कार्यान्वीत करण्यात येणार आहे. यामध्ये कचरा संकलन, कचरा वाहतूक, कचरा वर्गीकरण व कचऱ्यावर पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे प्रक्रीया करुन विविध उत्पादने तयार करुन त्याची विक्री करण्याचे नियोजीत आहे.   

Swacha-Bharat Abhiyan
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावस्तरावर शाश्वत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करुन गावे हागणदरीमुक्त करण्यात येणार

याकरिता या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, संस्था, सेवाभावी संस्था (NGO) यांचेकडून आधुनिक तंत्रज्ञान विषयक सहकार्य व शास्त्रोक्त मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनशी संबंधीत उत्पादीत उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित उपकरणे उत्पादक, विक्रेते यांचेकडील उपकरणांची माहिती घेण्यात येणार आहे.

 

यासाठी घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे करणारे व्यक्ती, संस्था, सेवाभावी संस्था (NGO) यांनी त्यांचेकडे असलेले तज्ञ व्यक्तींची माहीती व त्याचे सादरीकरण तसेच घनकचरा व्यवस्थापनशी संबंधीत उत्पादीत करणारे उपकरणे उत्पादक कंपनी, विक्रेते यांनी त्यांच्याकडील उत्पादीत उपकरणाची सविस्तर माहीती, दर, वापर, तंत्रज्ञान, उपयोग ई ची माहिती असलेले माहीती पत्रक, व याबाबत माहिती सांगणारे तज्ञ व्यक्तीचे नाव त्यांचा संपर्क क्रमांकसह माहीती दिनांक २४ मे २०२१ सांय. ५.०० वाजता पर्यंत संबंधीतांनी त्यांचेकडे असलेली माहीती nbazppune@gmail.com या इमेल व स्वच्छ भारत मिशन (ग्राम) कक्ष, पुणे जिल्हा परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, कँप पुणे ०१ या पत्यावर व त्यांचे सादरीकरण सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद  यांनी केले आहे. तसेच प्राप्त माहितीच्या आधारे संबंधितांचे तंत्रज्ञान जिल्ह्यातील गावांमध्ये राबविले जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *