अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी, लखनौ तर्फे प्रा.संजय धांडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिष्ठित प्राध्यापक आणि सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर एनर्जी स्टडीजचे समन्वयक प्रा. संजय धांडे यांना अलीकडेच १६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी (पूर्वीचे उत्तर प्रदेश टेक्निकल युनिव्हर्सिटी), लखनौ द्वारे दीक्षांत समारंभात मानद डॉक्टरेट – डॉक्टर ऑफ सायन्स (ऑनॉरिस कॉसा) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
अब्दुल कलाम टेक्निकल विद्यापीठ हे उत्तर प्रदेशातिल सरकारी तांत्रिक विद्यापीठ आहे. ही पदवी आदरणीय श्रीमती आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. आनंदीबेन पटेल या अब्दुल कलाम टेक्निकल विद्यापीठ लखनौच्या विद्यमान कुलपती आणि उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल अहेत.
प्राध्यापक संजय धांडे हे लखनौ येथे झालेल्या सदर दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून होते. प्रा.संजय धांडे यांना मिळालेली ही पाचवी मानद डॉक्टरेट पदवी आहे.
या सन्मानाबद्दल कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू प्रा. एन. एस. उमराणी, कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार, प्रा. आदित्य अभ्यंकर, प्रा. सुभाष घैसास, प्रा. किरण देशपांडे, प्रा. शंकर पाटील तसेच सेंटर फॉर एनर्जी स्टडीजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा.संजय धांडे यांचे अभिनंदन केले आहे.