Protect children by vaccinating them regularly.

Protect children by vaccinating them regularly: – Appeal on behalf of Divisional Commissioner Saurabh Rao and Pediatric Task Force. 

Parents of children who are left to be vaccinated regularly should go to a government or private center and vaccinate their children, considering the possibility of large-scale infections in children during the coming monsoon season as well as the possible third wave of covid. Which will protect them from various diseases. Vaccines against various diseases are available at all government and municipal as well as private centers. Protect them by giving their benefits to all eligible children, an appeal has been made on behalf of Divisional Commissioner Saurabh Rao and the Pediatric Task Force constituted for Covid.

     It has been observed that parents are worried about taking their children to the hospital or vaccination center for regular vaccination after the outbreak of Covid-19 last year. According to the National Guidelines on Immunization, regular immunization facilities are available at government and municipal immunization centers even during epidemic periods. This facility is also available in private pediatric hospitals. Parents may be reluctant to go to the immunization center, fear of going to the health center during the covid period, lockdown may cause travel difficulties, covid wave, etc.

Child Vaccination
Protect children by vaccinating them regularly

At present, the second wave of Covid seems to be waning. Parents of children who are left to be vaccinated regularly should go to a government or private center to vaccinate their children, considering the possibility of large-scale infections in children in the coming monsoon season as well as the possible third wave of covid. Which will protect them from various diseases. Vaccines against various diseases are available at all government and municipal as well as private centers. Its benefits should be given to all eligible children and they should be protected.

In the near future, children can be vaccinated according to the results of the tests and the availability of vaccines after the approval of the government. Until then, however, all parents must vaccinate their children against various infectious diseases and strictly adhere to the Code of Conduct for Covid Prevention. Special care needs to be taken of children living with their mothers in orphanages, hostels, maintenance homes, remand homes, and prisons.

Parents should contact their family doctor, pediatrician, nearest government, municipal immunization center for more information on the dose of vaccine left over for various reasons and to protect their child, an appeal is being made on behalf of the Pediatric Task Force for Covid.

बालकांचे नियमीत लसिकरण करून त्यांना संरक्षित करा:- विभागीय आयुक्त  सौरभ राव व बालरोगतज्ञ टास्क फोर्स यांचे वतीने आवाहन.

आगामी पावसाळ्याच्या कालावधीत येणारे आजार तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता,  ज्या बालकांचे नियमित लसिकरण करण्याचे राहून गेले आहे, अशा बालकांच्या पालकांनी  शासकीय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे.  ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकीय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसी ची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित करा, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव  व कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात आले आहे.

     मागील वर्षी कोविड -१९ या जागतिक महामारीच्या संसर्गानंतर नियमित लसीकरण करिता बालकांना घेऊन दवाखाना किंवा लसीकरण केंद्रावर जाण्याविषयी पालकांच्या मनामध्ये भीती असल्याचे निदर्शनास आले आहे. लसीकरणाविषयी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार महामारीच्या कालावधीत देखील नियमित लसिकरणाची सुविधा शासकीय व महानगरपालिकांच्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध आहे.  तसेच खाजगी बालरोगतज्ञांच्या दवाखान्यांमध्ये देखील सदर सुविधा उपलब्ध आहे. लसिकरण केंद्रावर न जाण्यासाठी पालकांच्या मनातील संकोच, कोविड कालावधीत आरोग्य केंद्रावर जाण्याविषयी भीती , लॉकडाऊन त्यामुळे प्रवासाच्या अडचणी, कोविडची लाट इत्यादी कारणे असू शकतील. 

Child Vaccination
बालकांचे नियमीत लसिकरण करून त्यांना संरक्षित करा.

 

सद्यस्थितीमध्ये कोविडची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. आगामी पावसाळ्यामधील येणारे आजार तसेच कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, ज्या बालकांचे नियमित लसिकरण करण्याचे राहून गेले आहे, अशा बालकांच्या पालकांनी  शासकीय किंवा खाजगी केंद्रावर जाऊन बालकांना लस दिली पाहिजे.  ज्यामुळे त्यांना विविध आजारांपासून संरक्षण प्राप्त होईल. सर्व शासकीय व महानगरपालिका तसेच खाजगी केंद्रावर विविध आजारास प्रतिबंधक लसी ची उपलब्धता आहे. त्याचा लाभ सर्व पात्र बालकांना देऊन त्यांना संरक्षित केले पाहिजे. 

आगामी काळामध्ये चाचण्यांच्या निष्कर्षांनुसार व शासनाच्या मान्यतेनंतर लसींच्या उपलब्धतेनुसार बालकांचे लसीकरण करता येऊ शकेल. तथापि, तोपर्यंतच्या कालावधीत सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे विविध संक्रमित आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसिकरण करून घेणे व कोविड प्रतिबंधासाठी च्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अनाथ आश्रम , वसतिगृह, अनुरक्षण गृह, रिमांड होम व कारागृहामध्ये आई सोबत राहणाऱ्या बालकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

विविध कारणांमुळे राहिलेला लसीकरणाचा डोस देण्यासाठी व अधिक माहितीसाठी पालकांनी त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांना, बालरोगतज्ञाकडे, नजिकच्या शासकीय, महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर संपर्क करावा व आपल्या पाल्यांना सुरक्षित करावे, असे आवाहन कोविडसाठी गठित बालरोगतज्ञांच्या टास्क फोर्सच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *