बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे व्हाट्स अप बँकिंग सेवेच प्रारंभ.
पुणे : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या मुख्यालयातील एका कार्यक्रमात बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांचे हस्ते व्हाट्स अप बँकिंग सेवा सुरू केली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा व श्री ए बी विजयकुमार व बँकेच्या मुख्यालयातील सर्व सरव्यवस्थापक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. बँकेचे ग्राहक तसेच बिगर ग्राहक सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्हाट्स अप बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतील.
व्हाट्स अप बँकिंग सुविधा कार्यान्वित करण्यासाठी आपण आपल्या दूरध्वनी संपर्क यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचा 7066036640 हा क्रमांक प्रविष्ट करावा. बँकेकडून शिल्लक रकमेची माहिती, संक्षिप्त विवरण, धनादेशाच्या वसुलीची सद्यस्थिति, धनादेश पुस्तिकेची मागणी, शाखा / ए टी एम शोधणे, संपर्क माहिती , प्रविष्ट होण्याचा व बाहेर येण्याचा पर्याय इत्यादि सेवा बँकेतर्फेसादर करण्यात आल्या आहेत. व्हाट्स अप बँकिंग सेवा ही अण्ड्रोइड व आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे.
“सामाजिक माध्यमांचे वाढते महत्व लक्षात घेऊन व्हाट्स अप बँकिंग सेवा आमच्या ग्राहकांना आपले दैनंदिन बँकिंग व्यवहार सुलभपणे करता येतील. व्हाट्स अप बँकिंग सेवेमुळे बँकेच्या ग्राहकांना तसेच ग्राहक नसलेल्या व्यक्तींना मूल्यवर्धित विनाव्यत्यय व्यक्तीगत बँकिंग सेवेचा लाभ घेन्याचा आनंद मिळेल. तसेच बिगर ग्राहकांना व्हाट्स अप बँकिंग सुविधेद्वारे बँक ऑफ महाराष्ट्र बाबत विविध प्रकारची माहिती उपलब्ध होण्याची व्यवस्था या सुविधतेत असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव यांनी दिली.
“नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवा कार्यान्वित करण्यात बँक ऑफ महाराष्ट्रने आघाडी घेतली असून त्यामुळे अनेक महत्वाचे बदल घडून येत आहेत “ असे बँकेचे कार्यकारी संचालक श्री हेमंत टम्टा यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना संगितले.
“अत्याधुनिक तंत्रज्ञांनाच वापर करून आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नावीन्यपूर्ण योजना व सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. डिजिटल बँकिंग सेवेची नवनवीन दालने ग्राहकांना खुली करून ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील आमच्या भूमिकेची आम्ही पुनर्व्याख्या करीत आहोत असे बँकेचे कार्यकारी संचालक श्री ए बी विजय कुमार यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना संगितले
आपल्या व्हाट्स अप वर बँक ऑफ महाराष्ट्रच्या बँकिंग सेवा कार्यान्वित करण्यासाठीचे टप्पे :
पहिला टप्पा : आपण आपल्या दूरध्वनी संपर्क पुस्तिकेत बँक ऑफ महाराष्ट्रचा 7066036640 हा क्रमांक प्रविष्ट करावा.
दूसरा टप्पा : त्यानंतर व्हाट्स अपद्वारे “hi” असा संदेश त्या क्रमांकावर पाठवावा.
त्यास प्रतिसाद म्हणून विविध पर्याय उपलब्ध असलेला मेनूचा संदेश आपल्याला प्राप्त होती. सदर मेनूचा वापर करून आपण आपले बँकिंग व्यवहार सुरू करू शकता.