Meeting on counting under Ring Road land acquisition process.

Meeting on counting under Ring Road land acquisition process.

Accelerate land survey for ring road by resolving landowners’ grievances – Collector Dr. Rajesh Deshmukh

 Dr. Rajesh Deshmukh directed, to go to 25 villages where land is being acquired for the ring road and speed up the counting process by resolving the problems of landholders. Review meeting regarding land acquisition process for construction of Ring Road Highway to be conducted by Maharashtra State Road Development Corporation. It was recently held under the chairmanship of Rajesh Deshmukh. District Superintendent of Land Records Rajendra Gole, Sub-Divisional Officer Maval, Mulshi, Haveli, Daund-Purandar, Bhor, Khed, Deputy Superintendent of Land Records of the concerned talukas, all officers and engineers of Maharashtra State Road Development Corporation, officers of Monarch were present. While Dr. Chandrakant Pulkundwar, Vice President and Managing Director, Mumbai was present through video conferencing.

MSRDC
Maharashtra State Road Development Corporation

As the revenue administration has gone to the villages affected by the ring road and resolved all the queries and difficulties of the landowners, the opposition for the census has been reduced and so far 160 hectares of land in 12 out of 37 villages have been completed. Till now, the land acquisition process of 12 villages namely Ghotawade, Materewadi, Ambadwat, Kasar-Amboli, Katwadi (6 villages) in Mulshi taluka, Malkhed in Haveli taluka, Mandvi Budruk, Vardade, Ghera-Sinhagad, Mordadwadi (5 villages), and Mauje-Kusgaon in Bhor taluka. Done.

Preliminary notification for land acquisition in 46 villages of 5 talukas namely Maval, Khed, Haveli, Purandar, and Bhor for the Ring Road (East) route was published in the Gazette on 19th May 2021. As per this notification, Vice President Dr. Chandrakant Pulkundwar instructed the engineers of Maharashtra State Road Development Corporation to submit the land acquisition proposal to the Collectorate immediately.

रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत मोजणीबाबत बैठक संपन्न.  

जमीन धारकांच्या अडीअडचणी समाधान करून रिंगरोडसाठी जमीन मोजणी ला गती द्या – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 रिंगरोडसाठी जमिनी भूसंपादित होत असलेल्या २५ गावांमध्ये जाऊन जमीन धारकांच्या     अडी-अडचणींचे समाधान करुन मोजणी प्रक्रीयेस गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणा-या रिंगरोड महामार्गाच्या बांधकामाच्या भूसंपादन प्रक्रिये अंतर्गत मोजणीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे, उपविभागीय अधिकारी मावळ, मुळशी, हवेली, दौंड-पुरंदर, भोर, खेड, संबंधित तालुक्याचे उपअधिक्षक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व अभियंता, मोनार्चचे अधिकारी उपस्थित होते. तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुंबई हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. 

 

MSRDC
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ.

रिंग रोडने बाधित होणाऱ्या गावांमध्ये जाऊन महसूल प्रशासनाने जमीन धारकांच्या सर्व शंकाचे व अडीअडचणीचे निरसन केल्यामुळे मोजणीसाठी विरोध कमी होऊन आत्तापर्यंत ३७ गावांपैकी १२ गावातील १६० हेक्टर क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत मुळशी तालुक्यातील घोटावडे, मातेरेवाडी, अंबडवट, कासार-आंबोली, कातवडी (६ गावे), हवेली तालुक्यातील मालखेड, मांडवी बुद्रुक, वरदाडे, घेरा-सिंहगड, मोरदाडवाडी (५ गावे) व भोर तालुक्यातील मौजे- कुसगाव अशा एकूण १२ गावांची भूसंपादनाची मोजणी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. 

रिंगरोड (पूर्व) मार्गासाठी मावळ, खेड, हवेली, पुरंदर व भोर या ५ तालुक्यातील ४६ गावातील जमिनीच्या भूसंपादनाची प्राथमिक अधिसूचना दिनांक १९ मे २०२१ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ सादर करण्याच्या सूचना उपाध्यक्ष डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांना दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *