मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात.

मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा राज्याच्या आरोग्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांचा दावा.Omicron-Variant Image

मुंबई : मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा, आयसरच्या हवाल्यानं राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे. या दोन्ही महानगरातील वाढत्या ओमिक्रॉन प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आयसर या संस्थेनं ओमिक्रॉन संसर्गाचं सर्वेक्षण केलं आहे.

त्यात बाधा झालेल्या ३८ रुग्णांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नव्हता. यामध्ये लक्षणं  नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. लक्षणं कमी, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी; तसंच मृत्यूचं प्रमाणही कमी असलं तरी हा संसर्ग वाढू नये यासाठी आपण सर्वांनी नियम पाळणं गरजेचं आहे; असं आवटे यांनी म्हटलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *