राज्यभरातून क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

राज्यभरातून क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

मुंबई : राज्यातल्या पहिल्या महिला शिक्षक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती त्यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणूनही साजरी केली जाते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईंची

First female teacher Krantijyoti Savitribai Phule,
पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

जन्मशताब्दी १२ जानेवारीला साजरी होणार आहे. त्यानिमित्त आजपासून १२ जानेवारीपर्यंत जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत आज राज्यभरात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम होत आहेत.

शाळाबाह्य मुलींसाठी विविध स्पर्धा, प्रदर्शनं, परिसंवाद आणि व्याख्यानं, तसंच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्रांचं आयोजन केलं जाणार आहे. कोविड नियमांचं पालन काटकोरपणे करत विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. सावित्रीबाई यांचं स्त्री शिक्षणासाठीचं योगदान चिरंतन आहे असं ते म्हणाले.

सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या, देश आणि देशातील स्त्रीशक्ती त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाईंटच्या नायगाव या जन्मगावी जाऊन आदरांजली वाहिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *