पुणे शहरात पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांच्या वर.
पुणे शहरात ४ दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानं पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांच्या वर.
पुणे: पुणे शहरात चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानं पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानं अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे शहरात गेल्या 15 दिवसांत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दुपटीहून अधिक वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णसंख्येतील वाढ नगण्य आहे.
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी महापालिका हद्दीत सहा हजार सातशे खाटांची तयारी करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल आठशे 52 नवीन रुग्णांची भर पडली. कोविड-19 मुळे काल पुणे जिल्ह्यात 7 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या रोगामुळे जिल्ह्यात 19 हजार आठशे 36 रुग्ण दगावले आहेत.