कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी अवघ्या २०२ धावात भारताचा डाव आटोपला.
जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या २०२ धावांत गडगडला.
भारताचा आघाडीचा फलंदाज के.एल.राहुलनं केलेली अर्धशतकी खेळी आणि फिरकीपटू अश्विननं केलेल्या ४६ धावांव्यतिरिक्त भारताचा इतर कोणताही फलंदाज विशेष प्रभाव पडू शकला नाही.
त्यामुळं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगलट आल्याचं स्पष्ट झालं.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघानं १ गड्याच्या मोबदल्यात ३५ धावांपर्यंत मजल मारली होती. या मालिकेतला पहिला कसोटी सामना जिंकून भारतीय संघानं या मालिकेत आघाडी घेतली आहे.