देशाचं नवं शैक्षणिक धोरण महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘नयी तालीम’ चं अनुकरण करत असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाचं नवं शैक्षणिक धोरण महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘नयी तालीम’ चं अनुकरण करत असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन.

दिल्ली: देशाचं नवं शैक्षणिक धोरण हे महात्मा गांधी यांनी दिलेल्या ‘नयी तालीम’ चं अनुकरण करत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.

या नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक, आणि माध्यमिक शाळांमध्ये मातृभाषेत शिक्षण, तसंच विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता वाढण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर दिला आहे, असं त्यांनी सांगितलं.

याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं अनावरण, तसंच अटल बिहारी वाजपेयी भवन, आणि चंद्रशेखर आजाद वसतिगृहाचं लोकार्पण राष्ट्रपतींनी ई-माध्यमाद्वारे केलं. रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून विद्यापीठाच्या प्रतीक चिन्हाचं लोकार्पणही यावेळी झालं.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, विद्यापीठाचे कुलपती रजनीष कुमार शुक्ल उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *