A review meeting of the situation in the state of mucous mycosis with corona was held

A review meeting of the situation in the state of mucous mycosis with corona was held under the chairmanship of the Deputy Chief Minister.

Emphasis should be placed on corona testing of high-risk, low-risk individuals exposed to corona infection while emphasizing institutional isolation rather than home isolation of corona-infected patients to break the chain of corona infection in the state. Under Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana, a list of 131 hospitals providing free treatment for mucositis should be published. To strengthen the Corona fight, Deputy Chief Minister Ajit Pawar today directed to conduct oxygen, electric, and fire audits of hospitals in the state, approving 25 percent funds from the 15th Finance Commission as well as secondary mineral funds for health expenditure.

Ajit Pawar
A review meeting of the situation in the state of mucous mycosis with corona was held under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar

A review meeting of the situation in the state of mucous mycosis with corona was held under the chairmanship of Deputy Chief Minister Ajit Pawar in the committee room of the Deputy Chief Minister’s Office in the Ministry. Health Minister Rajesh Tope, Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingane, Chief Secretary Sitaram Kunte, Additional Chief Secretary of Finance Debashish Chakraborty, Principal Secretary of Relief and Rehabilitation Asim Kumar Gupta, Secretary of Medical Education Saurabh Vijay, National Health Mission Commissioner Ramaswamy, Food and Drug Administration Commissioner Parimal Singh, Director of Medical Education Dr. . Dr. Tatyarao Lahane, President of Kovid Task Force All the Divisional Commissioners, Municipal Commissioners, District Collectors including the Speaker Salunkhe were present through VC.

 

Approval for expenditure on health from the amount of 25 percent funds in the 15th Finance Commission, secondary mineral fund

Instructions to conduct oxygen, electric and fire audits of hospitals in the state immediately

Publish a list of 131 hospitals treating mucosal mycosis under Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana

Update the number of patients with mucosal mycosis on the portal

Funding for the treatment of mucosal mycosis with corona will not be reduced
-Deputy Chief Minister Ajit Pawar

 

 

Deputy Chief Minister Ajit Pawar said that while corona infection is declining in urban areas of the state, it is increasing in rural areas. Emphasis should be placed on institutional segregation rather than home segregation of corona victims to break the chain of infection in rural areas. In villages where the number of coronaviruses is high, comprehensive tests should be done. Also, to speed up the corona tests, Asha workers should be trained and tested through them. Village Vigilance Committees should be made more efficient. In the district where there are strict restrictions, on the backdrop of Kharif season, it is planned to keep the shops of seeds, fertilizers, agricultural implements open for the convenience of the farmers.
Mucor mycosis can be cured if medication is started immediately after the first stage of the disease is diagnosed. Therefore, treatment should be started on these patients in the first stage, so that no one will have to lose his life due to this disease. As the control of mucositis drugs is in the hands of the central government, updated registration of mucositis patients in every district should be done on the portal. Accordingly, you will have access to medicines. To some extent, drugs for mucosal mycosis will be developed through the Halfkin Institute. Also, we will be making these drugs available through global tenders, so the availability of these drugs may improve to some extent next month. However, Deputy Chief Minister Ajit Pawar instructed to distribute these drugs properly and effectively through the district administration as well as Remedicivir.
While preparing for the possible third wave of Corona, Deputy Chief Minister Ajit Pawar suggested setting up of Kovid Center in rural areas as well. Separate arrangements should be made for the treatment of children and a team of pediatricians should be set up. Accelerate the construction of oxygen plants in the state. Also, proper use of oxygen should be planned in every hospital. Also, an auditor should be appointed to check the bills of the patients in the private hospital, through which the bills of each patient should be checked.
.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकर मायकोसिस च्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा बैठक.

             

 राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधित रुग्णांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरण यावर भर देताना, कोरोना संसर्गाच्या संपर्कात असणाऱ्या हाय-रिस्क, लो-रिस्क व्यक्तींच्या कोरोना चाचणी वर भर द्यावा. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी. कोरोना लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्चासाठी मंजूरी  देत, राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.     

Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकर मायकोसिस च्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा बैठक.

 

               मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकर मायकोसिस च्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिश चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सभाष साळुंखे यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते. 

 

पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी, गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्चासाठी मंजुरी 

 

राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करण्याचे निर्देश 

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिसवर उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करा

 

म्युकर मायकोसिस च्या रुग्ण संख्येची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करा

 

कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही

-उपमुख्यमंत्री अजित पवार 

 

 

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यातील शहरी भागातील कोरोना संसर्ग कमी होत असताना ग्रामीण भागातील संसर्ग वाढत आहे. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात. तसेच कोरोना चाचण्यांचे वेग वाढविण्यासाठी आशा वर्कर ना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात. ग्रामदक्षता समित्यांना अधिक क्षमतेने कार्यान्वित करावे. कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचे नियोजन करावे. 

         म्युकर मायकोसिस या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरु केल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे या रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरु करण्यात यावेत, त्यामुळे या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही. म्युकर मायकोसिस च्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यात म्युकर मायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात म्युकर मायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तसेच ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे, त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल. मात्र रेमडीसीव्हीर प्रमाणेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच या औषधांचे योग्य आणि प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

          कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी. राज्यात सुरु असणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीला गती द्यावी. तसेच प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन वापराचे योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणुक करावी, त्यामाध्यमातून प्रत्येक रुग्णांच्या बिलाची तपासणी करण्यात यावी. 

 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *