चालू आर्थिक वर्षात भारताची ३०० अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात – पियुष गोयल.
भारत निर्यातीच्या क्षेत्रात मोठी प्रगती करत असून, चालू आर्थिक वर्षात गेल्या ९ महिन्यात भारताने ३०० अब्ज अमेरिकी डॉलर्स ची निर्यात केली आहे, भारताच यावर्षी ४०० अब्ज डॉलर्स निर्यातीच लक्ष्य लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
गोयल पुढे म्हणाले की गेल्या महिन्यात भारताने ३७ अब्ज डॉलर्स ची निर्यात केली जी, डिसेम्बर २०२० पेक्षा ३७ टक्क्यांनी जास्त आहे. भारताने आतापर्यंत केलेल्या निर्यातीमध्ये सेवा क्षेत्राने १७९ अब्ज डॉलर्स ची निर्यात केली असून, ती या आर्थिक वर्षाच्या शेवटी २३० अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस प्रणीत युपीए आघाडी सरकारच्या काळात म्हणजे २००४ ते २०१४ दरम्यान चीन मधून करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंच्या आयातीत १ हजार पट वाढ झाली होती, ती भाजप शासनाने गेल्या ७ वर्षात बऱ्याच प्रमाणात कमी करत आणली आहे, अशी माहितीही गोयल यांनी यावेळी दिली.