देशातील प्रचलित धोक्याची परिस्थिती आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा अमित शहा यांनी घेतला आढावा.

देशातील प्रचलित धोक्याची परिस्थिती आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा अमित शहा यांनी घेतला आढावा.Amit Shah holds high-level security meeting

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं एअ उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतली आणि देशातील प्रचलित धोक्याची परिस्थिती आणि सुरक्षाविषयक आव्हानांचा आढावा घेतला.

केंद्रीय गुप्तचर एजन्सी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, सशस्त्र दलांच्या गुप्तचर शाखा, महसूल आणि आर्थिक गुप्तचर संस्था, देशाच्या सुरक्षा संस्थांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक देखील दूरद्रुश्यप्रणालीद्वारे बैठकीत सामील झाले.

दहशतवाद आणि जागतिक दहशतवादी गट, दहशतवादी वित्तपुरवठा, संघटित गुन्हेगारी-दहशतवादी संबंध, सायबर स्पेसचा बेकायदेशीर वापर आणि परदेशी दहशतवादी लढवय्यांचे हालचाल यांच्या सततच्या धोक्यांवर शहा यांनी प्रकाश टाकला. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा एजन्सींमध्ये उत्तम समन्वयावर गृहमंत्र्यांनी भर दिला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *