There is no sign of danger to children in the third wave.

There is no sign of danger to children in the third wave.

 There are no signs yet that the third wave of the corona is more harmful to young children. AIIMS chief Dr. Ranjit Guleria said there was no reason for parents to panic. Children do not appear to have a serious infection. But these groups of the population are seeing a collective push. Children are stressed due to uncertainty about exams during the period of infection. This has caused them more damage. Therefore, society should come forward to help the children. Dr. Guleria also added that children are the backbone of society. The rate of infection of parents and children in the first and second waves is relatively low in our country. Therefore, the claim that the third wave could have serious consequences has not yet been found to be medically true. Associations of pediatricians found no facts in the claims that the third wave of infection would be harmful to young children. So there is no reason for people to panic. He said there is a lot of stress on society right now. So we should come forward to help each other.

 The number of corona victims is increasing in rural areas. So we have to guarantee that they will get tested and get good treatment. Virus infection always comes in waves. So we have to be prepared so that there will be no more waves. He suggested that caution should be exercised. Mucous myositis is a fungal disease. It is not transmitted from one person to another. Therefore, timely treatment and precaution should be taken on them more effectively. It should also be noted that it is not a contagious disease, he said. 

Many are saying that the third wave of the corona is dangerous for children. Therefore, there is a concern in the country. Against this background, the statements made by Dr. Guleria have gained importance. The country has the experience of facing two waves. Therefore, it cannot be assumed that the third wave of corona will come. At the same time, he clarified that it is not affordable to have all the mechanisms to deal with the potential infection, as well as any kind of laxity in measures. The state government has made provisions to reserve some beds for children in the state. Efforts have been made on the battlefield to prevent the third wave from occurring and to deal with it in the current manner. 

 

तिसर्‍या लाटेत मुलांना धोका असल्याची चिन्हे नाही. 

 कोरोनाची तिसरी लाट  लहान मुलांसाठी अधिक हानिकारक असल्याची कोणतीही चिन्हे अद्याप आढळली नाहीत.  त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण आता तरी दिसत नाही असे ऐम्स  प्रमुख डॉक्टर रणजीत गुलेरिया यांनी सांगितले.   मुलांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाल्याचे दिसत नाही.  मात्र लोकसंख्येच्या या गटांना एकत्रित धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. संसर्गाच्या काळामध्ये परीक्षा बाबतच्या अनिश्चिततेमुळे मुले तणावात आहेत.  त्यामुळे त्यांचे अधिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे मुलांना मदत करायला समाजानेच पुढे यायला हवे.  कारण  मुले हा समाजामध्ये कणा  आहे अशी पुस्तीही डॉक्टर गुलेरिया यांनी जोडली. पहिल्या-दुसऱ्या लाटा मध्ये पालकांना आणि मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण आपल्या देशात तुलनेने फार कमी राहिले आहे.  त्यामुळे तिसऱ्या लाटेचा  गंभीर परिणाम होऊ शकतो या दाव्याला   वैद्यकीयदृष्ट्या अद्याप तरी तथ्य आढळून आले नाही.  संसर्गाची  तिसरी लाट लहान मुलांसाठी हानिकारक ठरेल या दाव्यांमध्ये बालरोग तज्ञांच्या संघटनांना कोणतेही तथ्य आढळून आले नाही.  त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ते म्हणाले सध्या समाजावर खूप ताण आहे.  त्यामुळे आपण एकमेकांना मदत करायला पुढे आले पाहिजे. 

 ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची   संख्या वाढत आहे.  त्यामुळे त्याच्या चाचण्या आणि चांगले उपचार  मिळतील याची हमी आपण दिली पाहिजे.  विषाणूचा संसर्ग हा नेहमी लाटेने  येतो.   त्यामुळे आपण यापुढे लाटच येऊ नये अशी तयारी केली पाहिजे.  तशी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे त्यांनी सुचवले.  म्युकर मायोसीस  हा आजार बुरशीजन्य आहे.  तो त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही.  त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार आणि सावधानता अधिक  परिणामकारकतेने बाळगायला हवी.  त्याचबरोबर हा संसर्गजन्य आजार नाही हेही लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट हि  मुलांसाठी घातक असल्याच्या अनेक जण सांगत  होत आहे.  त्यामुळे देशात चिंता व्यक्त होत आहे.  या पार्श्वभूमीवर डॉक्टर गुलेरिया  यांनी केलेल्या त्या विधानांना  महत्त्व प्राप्त झाले आहे .

 देशाजवळ दोन लाटांचा  सामना करण्याचा अनुभव आहे.  त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट  येणारच असे ठामपणे मानून चालणार नाही. त्याच बरोबर संभाव्य  संसर्गाला तोंड  देण्यासाठी सर्वच यंत्रणा, तसेच उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता  येणे परवडणारे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.  राज्यातील लहान मुलांसाठी काही बेड  राखीव ठेवण्याची तरतूद राज्य सरकारने केली आहे.  तिसरी लाट येऊच नये आणि आली तर सध्याच्या पद्धतीने मुकाबला करता यावे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *