एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) ची उजाला कार्यक्रमांतर्गत ऊर्जा कार्यक्षम, किफायतशीर एलईडी वितरणाची 7 वर्षे पूर्ण.

energy-efficient and affordable LED

UJALA completes 7 years of energy-efficient and affordable LED distribution.

एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) ची उजाला कार्यक्रमांतर्गत ऊर्जा कार्यक्षम, किफायतशीर एलईडी वितरणाची 7 वर्षे पूर्ण. energy-efficient and affordable LED

नवी दिल्ली : एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या संयुक्त उपक्रमाने त्याच्या महत्वाकांक्षी उजाला कार्यक्रमांतर्गत एलईडी दिवे वितरण आणि विक्रीची सात वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत.

अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) द्वारे उन्नत ज्योती कार्यक्रमाची सुरुवात 5 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. अल्पावधीत, हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा शून्य अनुदानित देशांतर्गत प्रकाश कार्यक्रम म्हणून विकसित झाला आहे जो उच्च अकार्यक्षम प्रकाशामुळे होणारा विद्युतीकरण खर्च आणि उच्च उत्सर्जन यासारख्या समस्यांचे निराकरण करतो. आजपर्यंत, देशभरात 36.78 कोटींहून अधिक एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलेल्या कार्यक्रमाचे यश ऊर्जा कार्यक्षमतेसाठी त्याच्या अतुलनीय धोरणात्मक दृष्टिकोनामध्ये आहे.

वर्ष 2014 मध्ये, उजाला ने एलईडी बल्बची किरकोळ किंमत प्रति बल्ब 300-350 रुपयांवरून प्रति बल्ब 70-80 रुपयांवर आणण्यात यश मिळवले. सर्वांसाठी परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्यासोबतच, कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बचतही झाली. आजपर्यंत, वार्षिक 47,778 दशलक्ष kWh ऊर्जेची बचत झाली आहे. कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनात 3.86 कोटी टन कपातीसह 9,565 मेगावॅट सर्वाधिक मागणी टाळण्यात आली आहे.

सर्व राज्यांनी उजालाचा तत्परतेने स्वीकार केला आहे. यामुळे वार्षिक घरगुती वीज बिल कमी होण्यास मदत झाली आहे. ग्राहक पैसे वाचविण्यात, त्यांचे जीवनमान सुधारण्यात आणि भारताच्या आर्थिक विकास आणि समृद्धीमध्ये योगदान देण्यास सक्षम झाले आहेत.

या कार्यक्रमांतर्गत, सरकारने पारदर्शकता सुनिश्चित केली आहे आणि वस्तू आणि सेवांच्या ई-खरेदीद्वारे स्पर्धेला प्रोत्साहन दिले आहे. यामुळे व्यवहाराच्या किमतीत आणि वेळेत लक्षणीय घट झाली असून प्रक्रिया कार्यक्षमता वाढली आहे. उजालामुळे एलईडी बल्बची किंमत 85 टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे, निविदा दाखल करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली, उत्पादनाचा दर्जा सुधारला आणि ग्राहकांसाठी चांगल्या वैशिष्ट्यांची उपलब्धता निर्माण झाली. उद्योगातील वाढती स्पर्धा आणि मोठ्या प्रमाणावर खरेदीचा लाभ घेत, EESL ने एक नाविन्यपूर्ण खरेदी धोरण स्वीकारले आहे ज्यामुळे चांगले फायदे मिळाले आणि आता ते उजाला कार्यक्रमाचा विशेष मुद्दा म्हणून ओळखले जाते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *