Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) to organize Startup India Innovation Week.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे उद्घाटन.
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) येत्या 10 ते 16 जानेवारीदरम्यान, स्टार्ट अप इंडिया-नवोन्मेष सप्ताह आयोजित केला जाणार आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या आभासी नवोन्मेष समारंभाचे आयोजन, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्तच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून करण्यात आले आहे. देशभरात स्वयंउद्यमशीलतेची व्याप्ती किती आहे त्यासोबतच, किती खोलवर ही उद्यमशीलता रूजली आहे, हे या सप्ताहात आपल्याला बघता येणार आहे.
स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहात विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. यात, विविध विषयांवर सत्रे असतील, असे की बाजारपेठ उपलब्धतेच्या संधी वाढवणे, उद्योजकांसोबत चर्चासत्रे, विविध राज्यात अवलंबल्या जाणाऱ्या उत्तम पद्धती, तंत्रज्ञान विषयक प्रदर्शने, कॉर्पोरेट क्षेत्राशी संबंध असे विषय असतील.
या कार्यक्रमात, मोठे धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील धुरीण, गुंतवणूकदार, स्टार्ट अप्स आणि या क्षेत्राशी संबंधित जगभरातील व्यक्ती सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या सर्व क्षेत्रातील हितसंबंधी व्यक्ती आणि समूह यांनी या सप्ताहासाठी https://www.startupindiainnovationweek.in/ या लिंकवर जाऊन नोंदणी करावी आणि यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्री गौतम आनंद (मोबाईल : 9205241872, ईमेल : gautam.anand@investindia.org.in) यांच्याशी संपर्क साधावा .