कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त.

Health Minister Rajesh Tope has expressed the need to file charges against those who do not follow the Corona Prevention Rules.

कोरोना प्रतिबंधक नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून व्यक्त.CORONA-MAHARASHTRA-MAP-

जालना: कोरोनाविषयक, निर्बंध न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हायला हवे. तसंच निर्बंधाचं पालन न केल्यास आणखी कठोर निर्बंध लावावेच लागतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज जालन्यात बोलत होते. आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सध्या रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं, प्राणवायूवर रुग्णाला ठेवावं लागण्याचं प्रमाण कमी असलं तरी ज्येष्ठ नागरिक, गंभीर व्याधी असलेले रुग्ण यांचा विचार करून, रुग्णसंख्या प्रमाणाबाहेर वाढण्याचा धोका लक्षात घेऊन नियमांची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी गर्दी  टाळणं, नियमांचं पालन करणं आणि लसीकरण आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून १० तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा. लसीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण संख्या आहे.असंही ते म्हणाले.

ज्या ठिकाणी पॉझिटीव्हिटी रेट २५ ते ३० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती  असेल तर त्या ठिकाणच्या शाळा स्थानिक प्रशासनाकडून बंद ठेवण्याचा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात येत आहे. लहान मुलांनाही ओमायक्रोनचा संसर्ग होण्याची शक्यता असून पालकांची मानसिकता लक्षात घेऊन अशा प्रकारचे निर्णय घेण्यात येत असल्याचं ते म्हणाले. मुख्यत्वे करून पुणे मुंबई परिसरातल्या या शाळा आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यात सध्या अशी स्थिती नसल्यानं लगेच शाळा बंद करण्याचा निर्णय घेणार नसल्याचं ते म्हणाले.

चित्रपट, नाट्यगृह, मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा लगेचंच प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील.मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.ला असू न त्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामूळे तो निर्णय घेण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले. धारावीमध्ये १ हजार रुपयात लस घेतलयाच प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *