The number of Covid-19 patients in the state is more than 36 thousand.
राज्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या ३६ हजारापेक्षा जास्त.
मुंबई : राज्यात काल कोविड-१९ च्या ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सर्वाधिक २० हजार १८१ रुग्ण आढळले आहेत.
राज्यात आता अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ८४७ वर पोचली असून, त्यापैकी मुंबईत ७९ हजार २६० रुग्ण आहेत.
मुंबईत काल आढळलेल्या रुग्णांपैकी १७ हजार १५४ म्हणजे ८५ टक्के रुग्णांमधे कोणतीही लक्षणं नाहीत. त्यामुळे १ हजार १७० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
राज्यात काल ८ हजार ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६७ लाख ९३ हजार २९७ जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आतापर्यंत ६५ लाख ३३ हजार १५४ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४१ हजार ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक १७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ८ शतांश टक्के आहे.
राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झाले ७९ रुग्ण आढळले. त्यापैकी मुंबईत ५७, ठाणे महानगरपालिका ७, नागपूर ६, पुणे महानगरपालिका ५, पुणे ग्रामीण ३, तर पिंपरी चिंचवडमध्ये एक रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत एकूण ८७६ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३८१ रुग्णांना, त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून, घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.