कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लागू केले नवेनिर्बंध.

The state government has imposed new restrictions on the growing corona infection.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लागू केले नवेनिर्बंध.

Several States impose Night curfew and other restrictions
File Photo
मुंबई : राज्यातकोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारनं नवेनिर्बंध लागू केले आहेत. येत्या १० जानेवारीपासून हे निर्बंध लागू होतील. यानुसारपहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी, लागू केली आहे. या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. रात्री ११ तेपहाटे ५ या वेळेत अत्यावशक सेवा वगळता कोणालाही प्रवास करता येणार नाही.

लग्नसमारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीलाच परवानगी असेल. तरअंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येईल. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना कमाल५० जण उपस्थित राहू शकतील. शाळा, महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. यात केवळ राज्यमंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्याकेवळ १० वी १२ वीच्या परीक्षा तसंच इतर सरकार शैक्षणिक विभागांकडून घेतल्याजाणाऱ्या कार्यक्रमांना नियोजित कृती कार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगीअसणार आहे.

जलतरण तलाव, व्यायाम शाळा, सौंदर्यप्रसाधनगृहं बंद राहतील. केशकर्तनालयं ५० टक्के क्षमतेनं चालू शकतील, मात्रकोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन त्यांना करावं लागेल. मनोरंजन उद्यानं, प्राणीसंग्रहालय, वस्तुसंग्रहालयं, किल्ले, स्थानिकपर्यटन स्थळं बंद राहतील. मॉल्स, बाजारसंकुलं यांना ५० टक्के क्षमतेनं परवानगी असेल. मात्र, त्यासाठी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *