Mucormycosis: Precautions that must be taken.

Mucormycosis: Precautions that must be taken.

Patients who have recovered from the coronavirus have been found to have a number of physical ailments related to the functioning of vital organs such as the heart, lungs, kidneys, and brain. In the last few months, a number of patients with mucorrhoea have been diagnosed. This disease, which is already known in medical science, is known as ‘Black Fungus Infection’ or ‘Black Fungus’. This disorder, which is so rare to date, has created unreasonable fear as it is not known to the general public.

There are many types of invisible micro-organisms on the back of the world. Just like viruses, bacteria, fungi/molds also come in micro-organisms. As viruses and bacteria, there are numerous species and species of fungi. Mucormycosis is a serious fungal disease caused by a group of fungal microorganisms in the group Mucorrhythmias.

Pune Municipal Corporation has taken an important decision as the incidence of mucormycosis is increasing with Corona. A door-to-door survey of Corona freed citizens will be conducted in Pune from June 1. Such information has been given by the municipal administration. Municipal Corporation has set up an OPD center at Kamla Nehru Hospital. If any patient is found to be infected with mucormycosis during the survey, he will be treated at Dalvi Hospital. A separate ward has also been set up at Dalvi Hospital for this purpose. This information was given by NMC Additional Commissioner Rubel Agarwal.
In Pune, there is an increase in the number of patients with myocardial infarction. The municipality is on alert mode to prevent the threat of black fungus. As part of this, the entire city will be surveyed from June 1. Importantly, patients undergoing treatment for mucosal mycosis will get financial assistance of Rs 3 lakh for treatment under the Urban Poor Scheme. This information has already been given by Mayor Murlidhar Mohol.

With the outbreak of corona in the country, the disease is now plagued by black fungus or mucormycosis. Its risk also increased with a rapid increase in patients with myocardial infarction. Black fungus has been declared an epidemic in many states. A large number of patients were found in Maharashtra, Gujarat, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Haryana, and Andhra Pradesh.

Member of the Policy Commission Dr. V. K. According to Paul, the disease black fungus existed even before the corona. Medical students also say that people with diabetes who have uncontrolled blood sugar are at greater risk. In addition to uncontrolled sugar, other diseases can cause black fungus.
People with low immunity are at higher risk.
Dr. Those whose sugar levels reach 700 to 800 are also known as diabetic ketoacidosis, Paul said. Such patients have a higher risk of black fungus. In such a situation, anyone from children to the elderly can fall victim to this disease. Meanwhile, a healthy person does not have to panic because of the black fungus. People with low immunity are at higher risk of contracting the disease, according to AIIMS. Nikhil Tandon said.

 

म्यूकोर्मिकोसिस: सावधगिरी बाळगणे आवश्यक.

करोना विषाणूने बाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडित अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामध्येच ‘म्युकॉरमायकोसिस’ या आजाराचे अनेक रुग्ण गेल्या महिन्यांत आढळून आले. वैद्यकीय शास्त्राला पूर्वीपासून ज्ञात असलेला हा आजार ‘ब्लॅक फंगस’ (Black Fungus Infection) किंवा ‘काळी बुरशी’ या नावानं ओळखला जातो. आजपर्यंत तसा दुर्मिळ असा हा विकार सर्वसामान्य जनतेला परिचय नसल्यानं अकारण भय निर्माण झाले आहे.

जगाच्या पाठीवर डोळ्यांनी न दिसणारे अनेक प्रकारचे सूक्ष्म जंतू असतात. विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया) यांच्या प्रमाणेच बुरशी (फंगस/ मोल्ड्स) हेही सूक्ष्म जीवजंतू मध्ये येतात. विषाणू आणि जिवाणूंप्रमाणेच बुरशीच्याही असंख्य जाती आणि प्रजाती असतात. ‘म्युकॉरमायकोसिस’ हा बुरशीजन्य गंभीर आजार असून, ‘म्युकॉरमायसेटीस’ या गटातल्या बुरशीजन्य सूक्ष्मजंतूंमुळे होतो.

कोरोनासह आता म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पुणे महापालिकेनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यात 1 जूनपासून कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांचं डोअर टू डोअर जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. महापालिकेनं कमला नेहरू रुग्णालयात ओपीडी सेंटर तयार केलं आहे. सर्वेक्षणादरम्यान कुणी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्ण आढळल्यास त्याच्यावर दळवी रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. त्यासाठी दळवी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिलीय.
पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. अशावेळी काळ्या बुरशीचा धोका टाळण्यासाठी महापालिका अलर्ट मोडवर आहे. त्याचाच भाग म्हणून 1 जूनपासून संपूर्ण शहरात सर्वेक्षण केलं जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे म्युकर मायकोसिस वर उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचारासाठी 3 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच दिली आहे.

देशात कोरोनाच्या प्रादुर्भावासह आता ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिस या आजाराने थैमान घातलंय. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वेगाने होणाऱ्या वाढीसह त्याचा धोकाही वाढला. अशा वेळी अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगस ला महामारी घोषित करण्यात आलंय. या मध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आली.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाच्या आधीही अस्तित्वात होता. तसंच हा आजार मधुमेह असलेल्या व्यक्तीला, ज्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नाही अशा लोकांना जास्त धोका असल्याचं वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी सांगतात. साखरेचे प्रमाण नियंत्रणात नसण्याबरोबरच अन्य आजार ही ब्लॅक फंगस चे कारण बनू शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना धोका अधिक आहे.
डॉ. पॉल यांनी सांगितलं की, ज्यांची शुगर लेव्हल 700 ते 800 पर्यंत पोहोचते, त्याला डायबेटिक कीटोएसीडोसिस असेही म्हणतात. अशा रुग्णांना ब्लॅक फंगस चा धोका अधिक असतो. अशा स्थितीत मुलांपासून वृद्धांपर्यंत कुणीही या आजाराला बळी पडू शकतो. दरम्यान, स्वस्थ व्यक्तीला ब्लॅक फंगस मुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, अशा लोकांनाच या आजाराचा जास्त धोका असल्याचे एम्सचे डॉ. निखिल टंडन यांनी म्हटलंय.

राज्य सर्वेक्षण अधिकारी ( आरोग्य विभाग ) डॉ. प्रदीप आवटे हे म्यूकर मायकोसिस ( बुरशी ) काय असते, त्याची लक्षणे काय असतात, कोणाला होतो, काय काळजी घ्यावी, यावर इलाज काय? या संदर्भातील माहिती या चित्रफितीच्या माध्यमातून देत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *