राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा पिकांना फटका.

Untimely rains hit crops in many places in the state.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा पिकांना फटका.

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे.रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, उरण, पाली, पेण, पनवेल या तालुक्यांमधे काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला, कडधान्य, पांढरा कांदा, आंबा या पिकांचं चांगलंच नुकसान झालं आहे.

अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांबरोबरच बाजारपेठांमधे व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. वीट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कलिंगड आंबा, काजू पिकांचे ही नुकसान झाले आहे , व रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस आणि गारांनी जनजीवन विस्कळीत केलं आहे.

सातारा शहर आणि परिसरात आज सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून, वातावरण सध्या ढगाळ आहे. बुलडाणा जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पाउस पडल्यानं गारठा वाढला आहे. त्याचबरोबर सध्या शेतात जमा झालेल्या तुरीच्या गंजी पावसात भिजल्यानं शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं.

अकोला जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटून आल्यानं शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. जिल्हाभरात तूर पिकाच्या सोंगनीला सुरुवात झाली असून काही भागात तुरीचे पीक सोंगून शेतात पडून आहे.पावसामुळे तुरीचे पीक भिजून नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. तसंच हरभरा फुलावर असल्यानं फुलगळ होण्याची भीती वर्तवली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *