Nature researcher Anuj Khare will unfold the world of birds through online seminar.

Nature researcher Anuj Khare will unfold the world of birds through the seminar ‘Nabhanganiche Mushafir’. 

Nature researcher Anuj Khare
Nature researcher Anuj Khare will unfold the world of birds through the seminar ‘Nabhanganiche Mushafir’

    An innovative initiative is being implemented under the concept of Rajya Sabha MP Vandana Chavan with the view that the various restrictions imposed on the Corona background should not cause any shortcomings in the ideological richness of all of them, even if many are at home. The online seminar is being organized through ‘Youth Connect and Urban Cell’ and the fifth session of this initiative will be held on Saturday 29th May. Nature researcher Anuj Khare will be interacting in an online program on ‘Nabhanganiche Mushafir’, a unique journey of the bird world.

 In the online seminars conducted by ‘Youth Connect and Urban Cell’ under the concept of MP Vandana Chavan, experts from various fields have benefited as eminent speakers. These dignitaries interacted on various topics. This online seminar is getting overwhelming responses from college students as well as youth from the social sector. Similarly, Anuj Khare, a senior bird watcher and nature expert, will be interacting online on Saturday, May 29 at 7 pm in the introductory session titled ‘Nabhanganiche Mushafir’. Anuj Khare’s journey from a diploma in marketing and business science to becoming a bird watcher is worth listening to. Today, while working in the field of nature, he is working on the member committees of various governmental and private circles related to nature. Aspects of different topics like a different world of birds, a journey as a bird watcher, and a nature area will be discussed in this seminar. You can participate in the seminar ‘Nabhanganiche Mushafir’ through the official Facebook page of MP Vandana Chavan.   

 

MP Vandana Chavan.
An innovative initiative of ‘Youth Connect and Urban Cell’ conceived by MP Vandana Chavan.

Online seminars on various topics were organized by Youth Connect and Urban Cell. Sushupti Sathe of Pratiti Center for Mental Health, which has guided the audience on the topic of ‘Mental Health’. Senior Editor and Political Analyst Sunil Mali spoke on two different topics, ‘Challenges Facing the City of Pune’ and ‘Water Supply in the City of Pune’. A few days ago, the senior thinker Dr. Datta Kohinkar guided the subject of ‘mind’s boundless power and stress relief’. Not only seminars but also various social activities like eco-friendly bicycle rallies, tree planting at Tukai Tekadi, graffiti selfies conveying social messages have been implemented by the Youth Connect and Urban Cell.

 

‘नभांगणीचे मुशाफिर’ चर्चासत्रातून निसर्ग अभ्यासक अनुज खरे उलगडणार पक्ष्यांचे विश्व.

Nature researcher Anuj Khare
‘नभांगणीचे मुशाफिर’ चर्चासत्रातून निसर्ग अभ्यासक अनुज खरे उलगडणार पक्ष्यांचे विश्व.

  खा.वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’ चा अभिनव उपक्रम.

  

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे अनेकजण घरी असले तरी, या सर्वांच्या वैचारिक समृध्दतेत कोणत्याही प्रकारची उणीव निर्माण होऊ नये, या दृष्टीकोनातून राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’ यांच्या माध्यमातून ऑनलाईन चर्चासत्रांचे आय़ोजन केले जात असून या उपक्रमाचे पाचवे सत्र शनिवार २९ मे रोजी पार पडणार आहे. पक्षी जगताची अनोखी सफर घडवून आणणा-या ‘नभांगणीचे मुशाफिर’ या विषयावर निसर्ग अभ्यासक अनुज खरे हे ऑनलाईन कार्यक्रमात संवाद साधणार आहेत.

 खा.वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’तर्फे राबवण्यात येणा-या ऑनलाईन चर्चासत्रांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मंडळी वक्ते म्हणून लाभली आहेत. निरनिराळ्या विषयांवर या मान्यवर व्यक्तींनी चर्चात्मक संवाद साधला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील तरूणांचा या ऑनलाईन चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अशाचप्रकारे ‘नभांगणीचे मुशाफिर’ या पक्षी जगताची ओळख करून देणा-या सत्रात निसर्ग अभ्यासक, ज्येष्ठ पक्षी निरीक्षक अनुज खरे हे शनिवार २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईनद्वारे संवाद साधणार आहेत. विपणन शास्त्र व व्यवसाय शास्त्रात पदविका ते पक्षी अभ्यासक होण्यापर्यंतचा अनुज खरे यांचा प्रवास ऐकण्यासारखा आहे. आज निसर्ग क्षेत्रात काम करत असताना निसर्गाशी संबंधित विविध शासकीय व खासगी मंडळांच्या सदस्य समितीवर ते काम करत आहेत. पक्ष्यांचे वेगळे विश्व, पक्षी अभ्यासक म्हणून एक प्रवास, निसर्ग क्षेत्र यासारख्या विविध विषयांचे पैलू या चर्चासत्रात उलगडणार आहेत. खा.वंदना चव्हाण यांच्या अधिकृत फेसबूक पेजच्या माध्यमातून ‘नभांगणीचे मुशाफिर’ या चर्चासत्रामध्ये तुम्हाला सहभागी होता येईल. 

MP Vandana Chavan.
खा.वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’ चा अभिनव उपक्रम..

 

 

 विविध विषयांवर मार्गदर्शन-

‘युथ कनेक्ट व अर्बन सेल’तर्फे राबवण्यात येणा-या या ऑनलाईन चर्चासत्रात आजवर, ‘प्रतिती सेंटर फॉर मेंटल हेल्थ’च्या सुषुप्ती साठे यांनी ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. ‘पुणे शहरासमोरील आव्हाने’ आणि ‘पुणे शहरातील पाणीपुरवठा’ या दोन वेगळ्या विषयांवर ज्येष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक सुनील माळी यांनी संवाद साधला. तर काही दिवसांपूर्वीच ‘मनाची अमर्याद शक्ती व तणाव मुक्ती’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्ता कोहिनकर यांनी मार्गदर्शन केले. केवळ चर्चासत्रेच नव्हे तर पर्यावरणपूरक सायकल रॅली, तुकाई टेकडी येथे वृक्षारोपण, सामाजिक संदेश देणारे भित्तीचित्र सेल्फी यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

 

 

 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *