Delhi Disaster Management Authority orders closure of all private offices, restaurants & bars with immediate effect.
वाढत्या कोरोना संसर्गामुळं दिल्लीतली खासगी कार्यालयं बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय.
नवी दिल्ली: नवी दिल्ली इथली सर्व खासगी कार्यालयं पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार असून कार्यालयाचं काम घरून सुरु राहील असं नवी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जारी केलेल्या सुधारित आदेशात म्हटलं आहे.
या आदेशानुसार ज्या खासगी कार्यालयांना या नियमातून वगळण्यात आलं आहे, या गटातली कार्यालयं मात्र कामकाजासाठी खुली राहतील. तसंच दिल्ली शहरातली सर्व उपाहारगृह आणि बार देखील बंद राहतील मात्र अन्नाची घरपोच सेवा सुरु राहील.
नवी दिल्ली इथले सर्व विभागीय न्यायदंडाधिकारी, पोलीस सह आयुक्त आणि महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात या आदेशांची कडक अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यावी असे निर्देश यात दिले आहेत.
नवी दिल्ली इथं काल कोरोनाच्या १९ हजार १६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला.