Distribution of Ambulances to Government Hospitals

Distribution of Ambulances to Government Hospitals, Dedication of Oxygen Concentrator and Oxygen Generation Plant by the Deputy Chief Minister.

In order to strengthen the public health system in the state, 442 ambulances were distributed to the government hospitals in the state by the Deputy Chief Minister and Guardian Minister Ajit Pawar. Health Minister Rajesh Tope, Collector Dr. Rajesh Deshmukh, Deputy Director, Health Services Dr. Milind More, Deputy Director, Health Services Pune Board, Pune Dr. Sanjog Kadam, District Surgeon Dr. Ashok Nandapurkar, District Health Officer of Zilla Parishad Dr. Bhagwan Pawar and Health department officials-staff were present.

The funds were received as per the announcement made by Deputy Chief Minister and Finance Minister Mr. Pawar in the budget. 442 new ambulances were distributed from that fund. Out of which 12 ambulances were distributed for Pune district, 13 for Satara, 9 for Solapur, 17 for Kolhapur, and 9 for Sangli. Ambulances will be distributed to other districts in the state as per their demand and need.

The Oxygen Concentrator and Oxygen Generation Plant were also inaugurated by the Deputy Chief Minister. Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurated 300 Oxygen Concentrators and 4 Oxygen Generation Plants provided by Tata Company at the Divisional Commissioner’s Office. Health Minister Rajesh Tope, District Collector Dr. Rajesh Deshmukh, and Chief Executive Officer of Tata Company were present on the occasion.

 

Ajit Pawar
Distribution of Ambulances to Government Hospitals by Deputy Chief Minister Ajit Pawar.
Tata Oxygen Concentrator
Dedication of Oxygen Concentrator and Oxygen Generation Plant by the Deputy Chief Minister.

 

 

 

 

 

 

शासकीय रुग्णालयांना रुग्णवाहिकांचे वाटप,  ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण. 

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी यावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राज्यातील शासकीय रुग्णालयांना ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री  तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपसंचालक, आरोग्य सेवा डॉ. मिलींद मोरे, उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार निधी मिळाला होता. त्या निधीतून घेतलेल्या ४४२ नवीन रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले.  त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी १२, सातारा १३, सोलापूर ९, कोल्हापूर १७ आणि सांगली ९ रुग्णवाहिकांचे आज वितरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे. 

तसेच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.   टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या ३०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा कंपनीचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *