सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्करप्रमुखांचं स्पष्टीकरण.

The Chief of Army Staff explained that the Army is ready to face all kinds of challenges.

सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचं लष्करप्रमुखांचं स्पष्टीकरण.Army Chief Manoj Narwane

कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे असं लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितलं आहे. सीमावर्ती भागात घुसखोरीचे चीनचे प्रयत्न भारतीय सैन्याने तत्परतेने हाणून पाडले असून हॉट स्प्रिंग्ज गस्ती चौकीचा वाद लौकरच मिटेल अशी आशा जनरल नरवणे यांनी व्यक्त केली.

उत्तरेला चीनी लष्कराबरोबर सकारात्मक वाटाघाटी चालू असून सैन्यदलांची सुसज्जता वाढवली आहे. सीमावर्ती क्षेत्रात कोणतेही बदल राबवण्याची मुभा घेणारा कायदा चीनने अलिकडेच केल्यासंदर्भात ते म्हणाले की उभयपक्षी संमत कराराचा भंग करणारा कोणताही कायदा भारताला बंधनकारक ठरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सर्व प्रसंगाला सामोरं जाण्याच्या दृष्टीने उत्तर सरहद्दीवर सर्वसमावेशक पद्धतीने पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे असं ते म्हणाले. पश्चिम सरहद्दीवर नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचे प्रयत्न वारंवार होत असून मोक्याच्या ठिकाणी दहशतवादी गटांच्या कारवायात वाढ झाली आहे असं सांगून ते म्हणाले की हे प्रकार उघडकीस आले की आपल्या पश्चिमेच्या शेजारी देशाचे कुटिल हेतू स्पष्ट होतील.

देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमांवर गेल्या वर्षभरात अनेक सकारात्मक बदल झाले असून परिस्थितीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. नागालँड गोळीबार प्रकरणाची चौकशी सुरु असून त्याचा अहवाल मिळाल्यावर योग्य ती कारवाई करु असं त्यांनी सांगितलं. म्यानमां सरहद्दीबाबत ते म्हणाले की आसाम रायफल्स बटालियनमधे वाढ करण्याची योजना आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *