10 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस.

Navi Mumbai CGST Commissionerate busts Input Tax Credit racket of more than Rs. 10 Crores.

नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाने 10 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस आणला.

या प्रकरणी एका व्यावसायिकाला अटक.

मुंबई: बेकायदेशीर इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट चालवण्यात येत असल्याच्या  गुप्त माहितीनुसार कारवाई करत, मुंबई प्रदेशाच्या अखत्यारीतील नवी मुंबई सीजीएसटीGoods & Service Tax अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मंडळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी मे. महाराष्ट्र एंटरप्रायझेस या कंपनीच्या मालकाला अटक केलीआहे. तसेच केंद्रीय CGST विभागाने 10 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या 15 बनावट संस्थांच्या नावावरील आणखी एका बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, या व्यवहारात  57 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या वस्तूंच्या कोणत्याही पावत्या न घेता किंवा प्रत्यक्षात या वस्तूंचा पुरवठा न करता बनावट पावत्यांवर हे घोटाळेबाज धातूच्या भंगार सामानाच्या खोट्या पावत्या जारी करून इनपुट टॅक्स क्रेडिट हडपत होते. मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांमध्ये या कंपनीच्या बेकायदेशीर व्यवहारांचे हे जाळे पसरले आहे.

ही कंपनी, लोखंडी कचरा आणि भंगार वितळवून त्यातील लोखंड अथवा पोलाद विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडे नोंदणीकृत आहे. मात्र या कंपनीच्या मालकाने सीजीएसटी कायदा 2017 चे उल्लंघन करत, कोणत्याही वस्तू अथवा सेवा न घेता, अनुक्रमे, 5 कोटी 17 लाख आणि 5 कोटी 11 लाख रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडीट हडपले आणि फसवणुकीने त्याचा वापर केला असे तपासणीअंती निदर्शनास आले.

अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या पावत्यांवर इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन यांच्या संपर्कातील इतर संस्थांना त्याचे हस्तांतरण करून ही कंपनी नियमित वस्तू आणि सेवा कराचा महसूल ज्यांच्या हक्काचा आहे त्या कंपन्यांवर अन्याय करून त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने स्पर्धा करत होती.

या प्रकरणी एका व्यावसायिकाला CGST कायदा 2017 च्या कलम 69 अन्वये कलम 132 ibid चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आणि त्याला वाशीच्या प्रथमवर्ग माननीय न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर आरोपीला 27 जानेवारी 2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळ्यात सहभागी होऊन, प्रामाणिक करदात्यांची फसवणूक करणाऱ्या आणि सरकारचा अधिकार असलेला महसूल हडपण्याचा गुन्हा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई प्रदेशाच्या सीजीएसटी विभागाने मोठ्या प्रमाणावर सुरु केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून आजची कारवाई करण्यात आली. यापूर्वीच्या कारवाईत, नवी मुंबई आयुक्तालयाने 8 जानेवारी 2022 रोजी सरकारी नोंदणी असलेल्या मे. ओम्नीपोटंट या कंपनीच्या दोन व्यावसायिकांना अटक केली होती. सुमारे 385 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार करून ही कंपनी 70 कोटी रुपयांहून अधिक रक्कमेच्या इनपुट टॅक्स क्रेडीटचे बनावट संस्थांना हस्तांतरण करत होती.

येत्या काळात हा विभाग असे फसवणुकीचे व्यवहार करणाऱ्या आणि करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *