लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन.

Prime Minister Narendra Modi’s appeal to remove misconceptions about vaccination.

लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन.Prime Minister Narendra Modi's appeal to remove misconceptions about vaccination.

नवी दिल्ली : लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करा. लसीकरणाविषयी अफवा पसरू देऊ नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातल्या ९२ टक्के जनतेनं लशीची पहिला मात्र घेतली असून सुमारे ७० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

संपूर्ण देशवासियांचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करणाऱ्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी आज देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उपस्थित होते.

कठीण भौगोलिक परिस्थितीतही ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात लसीकरण केलेल्या आशा कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणू बाबत पूर्वी असलेला संभ्रम आता दूर होताना दिसतो आहे. त्यामुळं नागरिकांनी जागरुक रहावं, घाबरुन जाऊ नये. सणासुदीच्या काळातही खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करु नये असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं.

ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त असेल तिथे अधिकाधिक चाचण्या करा. गरजेनुसार केवळ स्थानिक पातळीवर निर्बंध लादा असं ते म्हणाले. गृहविलगीकरण वाढवून घरीच उपचार देणं कसं वाढवता येईल, यावर लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *